Advertisement

ठाणेदार सचिन बागुल यांच्या कामगिरीची दखल; जळगाव जामोद पोलीस निरीक्षकपदी नियुक्ती.. सौ गीता सोनोने

ठाणेदार सचिन बागुल यांच्या कामगिरीची दखल; जळगाव जामोद पोलीस निरीक्षकपदी नियुक्ती. सौ गीता सोनोने

जळगाव जामोद पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक म्हणून उल्लेखनीय कामगिरी बजावणारे सचिन बागुल यांची जळगाव जामोद पोलीस ठाण्याच्या नियमित पोलीस निरीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी जिल्ह्यातील आठ पोलीस निरीक्षकांच्या बदल्यांचे आदेश जारी केले असून, त्यामध्ये सचिन बागुल यांची जळगाव जामोद येथे नियुक्ती करण्यात आली आहे.
प्रभारी पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत असताना सचिन बागुल यांनी कायदा व सुव्यवस्था राखण्याबरोबरच गुन्हेगारीवर प्रभावी नियंत्रण मिळवण्यासाठी सातत्याने ठोस कारवाई केली. अवैध धंद्यांवर धाडसत्र, फरार आरोपींना अटक, विविध गंभीर गुन्ह्यांचा छडा लावणे तसेच मंदिर चोरीसारख्या जुन्या गुन्ह्यांचा उलगडा करण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. जुगार, अवैध व्यवसाय आणि इतर गुन्हेगारी प्रवृत्तींवर त्यांनी कठोर कारवाई करून पोलिसांची प्रभावी उपस्थिती निर्माण केली.
त्यांच्या नेतृत्वाखाली जळगाव जामोद पोलिसांनी अनेक यशस्वी मोहिमा राबविल्या असून, त्यामुळे नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना अधिक दृढ झाली आहे. सर्वसामान्य नागरिकांच्या तक्रारी तत्परतेने ऐकून घेणे, लोकाभिमुख कामकाजाला प्राधान्य देणे आणि गुन्हेगारीविरोधात कठोर भूमिका घेणे ही त्यांची कार्यशैली विशेष ठरली आहे.

त्यांच्या नियमित नियुक्तीचे शहरातील व्यापारी, सामाजिक संघटना तसेच विविध स्तरांतील नागरिकांनी स्वागत केले असून, त्यांच्या नेतृत्वाखाली जळगाव जामोद पोलीस ठाण्याची कामगिरी आणखी प्रभावी होईल, कायदा व सुव्यवस्था अधिक मजबूत होईल आणि नागरिकांना सुरक्षित वातावरण मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Post a Comment

0 Comments