*गावाच्या विकासासाठी सदैव कटिबद्ध,पिंपळगाव राजा गावकऱ्यांचे ऋण कधीही फेडू शकणार नाही* .................... *माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा*
*लोकनेते स्व.अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त पिंपळगाव राजा येथे आयोजित जिल्हा परिषद सर्कल मेळाव्यामध्ये सानंदांच्या हस्ते घडयाळांचे वाटप*
खामगाव /(संतोष आटोळे )
सन 1999 मध्ये पहिल्यांदा विधानसभा निवडणूक लढविल्यापासून ते आजपर्यंत प्रत्येक निवडणुकीत पिंपळगाव राजा येथील सर्व समाजबांधवांनी भरभरून आशीर्वादरूपी मतदान करून माझ्यावर विश्वास व्यक्त केला आहे. त्या विश्वासाचे आणि प्रेमाचे ऋण मी आयुष्यभर विसरणार नाही. पिंपळगाव राजा गावाचा सर्वांगीण विकास करुन हे गाव समस्यामुक्त, आणि समृद्ध गाव बनविण्यासाठी मी सदैव वचनबद्ध असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून गावाच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणावर निधी आणण्याचा प्रयत्न करणार असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते तथा माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांनी केले.
लोकनेते स्व.अजितदादा पवार साहेब यांच्या जयंतीनिमित्त आयोजित जनसेवा सप्ताहाच्या पाचव्या दिवशी शुक्रवार दि.24 जुलै 2026 रोजी पिपंळगाव राजा येथे स्वतंत्र सेनानी स्व. हसनराव देशमुख सभागृहात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पिपंळगाव राजा - जळका भडंग जिल्हा परिषद सर्कलचा सर्कल मेळावा व घड्याळ वाटप कार्यक्रम पार पडला त्यावेळी ते बोलत होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक सेलचे बुलढाणा जिल्हा अध्यक्ष मोबीन अहमद, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठनेते पंजाबरावदादा देशमुख, खामगाव तालुका अध्यक्ष मनोज वानखडे, राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक सेलचे तालुका अध्यक्ष बिलाल खान पठाण , महेंद्रसिंग राठोड, सुरेशभाऊ बगाडे, सर्कल प्रमुख अनंता सातव,विजय चोपडे,ॲड.शामल गायगोळ,माजी सरपंच शब्बीर खा गुलशेर खान,पत्रकार लुकमान परवेज,ॲड. मोबीनऊद्दीन, माजी सरपंच अब्दुल गफूर,बाबू जमादार, मोहम्मद यासीन, बळीराम बोंबटकार, मो.निसार, वकार खान, निखिल महाले , विलाससिंग इंगळे, डॉ आकाश इंगळे, सुमित फाळके, मो.यासिन, शेख अजीज, सय्यद निजाम आदींची प्रमुख उपस्थिती होती.
पुढे बोलतांना माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा म्हणाले की, मतदार संघातील शेवटच्या घटकाला सत्तेच्या माध्यमातून शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ मिळावा यासाठी मी मागील वर्षी तत्कालीन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश घेतला. जी थोर संत-सुफी विचारधारा आहे , राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सुद्धा तीच विचारधारा आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राज्यामध्ये सत्तेत आहे, अनेक महत्त्वाची खाती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे आहे तसेच बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री पद सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे आहे त्यामुळे भविष्यात बुलढाणा जिल्ह्याचे लोकप्रिय पालकमंत्री मकरंदआबा पाटील यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात विकास निधी आणून पिंपळगाव राजा जिल्हा परिषद सर्कलमध्ये विकासाची कामे केली जातील. मागील दहा वर्षाच्या काळामध्ये पिंपळगाव राजा गावामध्ये पाहिजे तसा विकास झालेला नाही . गावातील मुख्य रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य आहे , म्हणून आगामी जिल्हा परिषद , पंचायत समिती आणि ग्राम पंचायतच्या निवडणुकीत ज्यांनी पिपंळगाव राजा गावाच्या विकासाकडे दुर्लक्ष केले अश्यांना धडा शिकविण्यासाठी स्व.अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला साथ द्या, असे आवाहन सानंदानी केले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्यांक सेल बुलढाणा जिल्हा अध्यक्ष मोबीन अहेमद यांनी आपल्या भाषणातुन सांगितले की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा शिव-शाहू-फुले-आंबेडकर-
मौलानाअबुल कलाम आझाद,राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या विचारसरणीवर चालणारा धर्मनिरपेक्ष पक्ष आहे.राणा दिलीपकुमार सानंदा हे सर्व जाती धर्मांतील लोकांना सोबत घेवुन चालणारे नेते आहेत.म्हणून अल्पसंख्यांक समाज बांधवांनी त्यांच्या पाठीशी राहुन आपला उत्कर्ष साधावा असे त्यांनी सांगितले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते पंजाबरावदादा देशमुख यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करतांना सांगितले की,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा हे मागील 40 वर्षापासुन जनसेवेचे व्रत हाती घेवुन सर्व सामान्यांची सेवा करत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून पक्ष संघटन वाढविण्यासाठी गाव तेथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची शाखा हा उपक्रम राबविल्या जात आहे. जनसेवा सप्ताहाच्या माध्यामातून अनेक सामाजिक,धार्मिक,अध्यात्मिक कार्यक्रमांचे आयोजन करुन समाजापयोगी कामे केली जात आहे असे त्यांनी सांगितले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक सेलचे खामगाव तालुका अध्यक्ष बिलाल खॉ पठान यांनी मनोगत व्यक्त करतांना सांगितले की, माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा हे सर्व जातीधर्माला सोबत घेवुन चालणारे नेते आहे. त्यांनी राष्ट्रवादी कॉग्रेस पक्ष आणि पालकमंत्री मकरंद आबा पाटील यांच्या माध्यमातून मोठया प्रमाणात विकासनिधी आणुन खामगाव शहरातील अल्पसंख्यांक समाज बांधवांच्या वस्तीमध्ये आणि ग्रामीण भागामध्ये सुध्दा कोटयवधी रुपयांची विकासकामे करत आहे. आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्राम पंचायतच्या निवडणुकीमध्ये मतदार बांधवांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत राहुन माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांचे हात बळकट करावे असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाचे सुत्र संचालकन डॉ.आकाश इंगळे यांनी तर आभार प्रदर्शन तालुकाध्यक्ष मनोज वानखडे यांनी केले.या सर्कल मेळाव्याप्रसंगी लोकनेते स्व.अजितदादा पवार साहेब यांच्या जयंतीनिमित्त माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांच्या हस्ते अंदाजे 500 लोकांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घडयाळयांचे वाटप करण्यात आले. यावेळी अमर रहे-अमर रहे-अजितदादा पवार साहेब अमर रहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विजय असो, आम्ही सर्व सुनेत्राताई पवार पर्व अश्या गगनभेदी घोषणा देण्यात आल्या. या सर्कल मेळाव्याला श्रीकांत महाले,हाजी अकबर बादशाह,मजीद शाह,उमेर खान,मो.नासीर, मो.अन्सार,वकार खान,शेख नुमान,शेख अजीज यांच्यासह जळका भडंग,ज्ञानगंगापुर,राहुड,घाणेगाव,वाकुड, कुऱ्हा, पारखेड, बेलुरा, तांदुळवाडी, पोरज, निमकवळा, हिवरा,मांडका, पिंपळगाव राजा या गावातील राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते हजारोंच्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments