**अलनिनोचा प्रभाव ओसरला; ऑगस्टमध्ये महाराष्ट्रात दमदार पावसाचा अंदाज!**
ऑगस्ट महिन्यात महाराष्ट्रात सर्वत्र चांगला पाऊस पडणार असून, यामुळे आतापर्यंत निर्माण झालेली पाण्याची तूट भरून निघण्यास मदत होईल, असा सकारात्मक अंदाज येथील हवामान अभ्यासक **प्रकाशभाई पारेख** यांनी वर्तवला आहे.
प्रकाशभाई पारेख यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रशांत महासागरातील 'अल निनो'चा (El Niño) प्रभाव आता कमी होत आहे. हिन्दीमहासागर्याचे पूर्व भागाचे पाण्याच्या पृष्ठभागाचे पाण्याचे तापमान सकारात्मक असल्याने बाष्पयुक्त ढगांसाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होत आहे. आणि अटलांटिक महासागरावरून हिंदी महासागराकडे पाण्याचा येणारा प्रभाव थंड आहे. त्याला त्याला अटलांटिक नीना संबोधिल्या जाते ही घटना ४० वर्षात 6 वेळा झाली आहे. त्यामुळे अलनिनोची तीव्रता कमी प्रमाणात होईल आणि भयंकर दुष्काळ पडणार नाही. भयंकर दुष्काळाची परिस्थिती निर्माण होणार नाही ढग ऑगस्ट महिन्यात
महाराष्ट्राच्या दिशेने आगेकूच करतील. त्यामुळे ऑगस्टमध्ये राज्यभरासह विदर्भातही सार्वत्रिक व दमदार पाऊस बरसेल. हा पाऊस पिकांसाठी अत्यंत फायदेशीर ठरणार असून शेती उत्पादनात मोठी वाढ होण्यास मदत होईल.
**'आयओडी' (IOD) अनुकूल झाल्याने पावसाला गती**
यापूर्वी हवेतील घटकांमुळे वाऱ्याचा वेग आणि ढगांची निर्मिती विस्कळीत झाली होती; परिणामी कुठे अतिवृष्टी तर कुठे अत्यल्प पाऊस अशी परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र, आता हिंदी महासागरात 'इंडियन ओशन डायपोल' (IOD) अनुकूल बनत असून प्रशांत महासागरात 'अल निनो'चा जोर ओसरत आहे. त्यामुळे बाष्पयुक्त ढग वेगाने पुढे सरकण्यासाठी आवश्यक असलेली गती निर्माण होत आहे. अमेरिकेतील 'नोव्हा' (NOAA) या प्रसिद्ध हवामान संस्थेनेही प्रशांत महासागरातील या सकारात्मक बदलांना दुजोरा दिला आहे.
यंदाच्या 'सुपर अल निनो'मुळे दुष्काळ पडेल किंवा पाण्याची आणीबाणी निर्माण होईल अशी भीती व्यक्त केली जात होती. परंतु, महासागरातील वेगाने झालेल्या या बदलांमुळे ती भीती आता मावळली आहे. त्यामुळे राज्यात दुष्काळाची परिस्थिती निर्माण होणार नाही आणि पिकेही उत्तम येतील, असा विश्वास पारेख यांनी व्यक्त केला आहे.यावर्षी निर्माण झाला होता प्रभाव
४० वर्षात सन 1999 सन 2002 सन २००९ सन २०१५ सन 2018 सन 2023 या वर्षात अल निनो आला होता तर यंदा २०२६ सन आलेला सुपर अलनिनोहा दीडशे वर्षानंतर आला आहे
0 Comments