धानोरा महासिद्ध येथे जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांना शिक्षण साहित्याचे वाटप .. सौ गीता सोनोने
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच आमदार डॉ. संजय कुटे यांच्या संकल्पनेतून धानोरा महासिद्ध येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना वह्या व पेनांचे वितरण करून शिक्षणाला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करण्यात आला.
या कार्यक्रमाला जळगाव जामोदचे तहसीलदार पवन पाटील हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारतीय जनता पार्टी बुलढाणा जिल्हाध्यक्ष सचिनबापू देशमुख होते. तसेच भाजप तालुकाध्यक्ष संजय पांडव, सरपंच विठ्ठल पैसोळे, उपसरपंच संदीप भोपळे यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
यावेळी भगवान टापरे, शालिग्राम गाडगे, गजानन चंदनकार, हरिभाऊ वसतकार, विनोद गाडगे, गजानन कोकाटे, अतुल खुपसे, दिगंबर हिवरकर, आनंद निर्मळ, मुरली गोतरकार, श्याम निर्मळ, गणेश गोतरकार, अमोल माहोदे, अतुल उमाळे, रुपेश दाभाडे, सुनील कुवारे, आनंद पैसोळे, मयूर घाटे, प्रथमेश खुपसे, मयूर उमाळे, शुभम उमाळे यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, शिक्षक, विद्यार्थी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून शिक्षणाला चालना देणाऱ्या अशा सामाजिक उपक्रमांचे उपस्थितांनी कौतुक केले.
0 Comments