*लोकनेते स्व.अजितदादा पवार साहेब यांच्या जयंतीनिमित्त सुटाळा बु.येथे माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा व जनाई भजनी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते वृक्षारोपण*
खामगाव/(संतोष आटोळे) एक वृक्ष.. हजारो श्वासांचे रक्षण हा संदेश देत लोकनेते स्व.अजितदादा पवार साहेब यांच्या जयंतीनिमित्त देवगिरी ते देवराई पर्यंत वृक्ष लागवड अभियान राबविण्यात येत आहे. खामगाव विधानसभा मतदार संघामध्ये सुध्दा स्व.अजितदादा पवार साहेब यांच्या जयंतीनिमित्त आयोजित जनसेवा सप्ताह दरम्यान ठिक-ठिकाणी वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. पर्यावरण संरक्षणाची सामाजिक जबाबदारी स्वीकारत वृक्ष लागवड करुन त्याचे संवर्धन करुन भावी पिढीला हिरवेगार समृध्द आणि निरोगी पर्यावरण देण्याचा आमचा मानस आहे असे प्रतिपादन माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांनी केले.लोकनेते स्व.अजितदादा पवार साहेब यांच्या जयंतीनिमित्त आयोजित जनसेवा सप्ताह अंतर्गत बुधवार, दि. 22 जुलै 2026 रोजी सुटाळा बुद्रुक येथे सुटाळा-वाडी जिल्हा परिषद सर्कल मेळावा उत्साहात पार पडला. याप्रसंगी सुटाळा बु. ग्राम पंचायतजवळ माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा व सुटाळा बु. येथील जनाई भजनी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते वृक्षारोपण कार्यक्रम पार पडला त्याप्रसंगी ते बोलत होते.
या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते पंजाबरावदादा देशमुख,राष्ट्रवादी काँग्रेसच्या खामगाव शहर अध्यक्षा श्रीमती सरस्वतीताई खासने,माजी पंचायत समिती सदस्य पुंडलिक वानखडे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खामगाव तालुकाध्यक्ष मनोज वानखडे, सुटाळा-वाडी जि.प.सर्कल प्रमुख अनंत धामोडे ,सुटाळा बु.पंचायत समिती सर्कल प्रमुख अक्षय चोपडे,वाडी पंचायत समिती सर्कल प्रमुख गोवर्धन ताठे, सुटाळा बु. ग्राम पंचायतचे सरपंच दिनेश इंगळे,माजी सरपंच त्र्यंबकराव इंगळे,पिंप्री देशमुखचे सरपंच शेषराव गोरे,तंटामुक्ती समितीचे माजी अध्यक्ष सदाशिव चोपडे,समाधान वानखडे,जनाई भजनी मंडळाचे अध्यक्ष सौ.लक्ष्मी ठाकरे,उपाध्यक्षा सौ.सुलोचना काळपांडे,सचिव सौ.स्मिता देशमुख आदींची प्रमुख उपस्थिती होती.
याप्रसंगी सुटाळा बु.ग्राम पंचायत परिसर व गावामध्ये विविध प्रजातीची देशी वृक्षांचे मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करुन उपस्थितांना वृक्षसंवर्धनाची शपथ देण्यात आली. यावेळी झाडे लावा-झाडे जगवा, हर बोला महादेव अश्या गगनभेदी घोषणा देण्यात आल्या. यावेळी जनाई भजनी मंडळाचे सदस्य सौ.बेबीनंदा इंगळे,सौ.ज्ञानेश्वरी अहिरे,सौ.कोकीळा चव्हाण,पार्वताबाई देवकर,सौ.वैशाली महाजन, सौ.शोभा धोटे,सौ.प्रमिला सोळुंके,सौ.सुशिला अवधुत,सौ.पुजा किरोचे,सौ.चंदा कुईटे यांच्यासह राजेश धामनकर, वैभव धामोडे,बाबुराव वनारे, गणेश कापडे, अजय खोद्रे, ललीत तांगडे, विजय बोर्डे, तौफीक खान,राम अंभोरे, पवन धामोडे,चांद बागवान,अर्जुन भोपळे,निवृत्ती चोपडे,श्रीकृष्ण बावस्कार, सुरसिंग जाधव, सोपान वानखडे, अजय राजपुत,गोलु इंगळे,गौरव साबे,अविनाश ढगे, श्रीकृष्ण डाबेराव,संदीप भोपळे यांच्यासह सुटाळा-वाडी जि.प.सर्कल मधील राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments