आरटीईची प्रवेश प्रक्रिया सुरू : तालुक्यातील 14 शाळांचा समावेश
जळगांव (जा.): शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) खासगी शाळांमध्ये आर्थिक दुर्बल व मागास घटकातील मुलांच्या प्रवेशासाठी जळगांव जा. तालुक्यातील 14 शाळांमधील 133 जागा उपलब्ध झालेल्या असुन शैक्षणिक वर्ष 2022-23 साठी पालकांना ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया 16 फेब्रुवारीपासून सुरु झाली आहे.
आरटीई 25 टक्के प्रवेशांचे 2022-23 या वषार्साठीचे संभाव्य वेळापत्रक शिक्षण विभागाने जाहीर केले आहे. त्यानुसार १६ फेब्रुवारीपासून ‘आरटीई’ प्रवेशासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. दरम्यान, अर्ज दाखल करण्यासाठी अंतिम दिनांक 02 मार्च, 2022 राहील. दरम्यान ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्यासाठी पालकाचे आधार कार्ड, पासपोर्ट, राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक, पॅन कार्ड, मतदान ओळखपत्र, रेशन कार्ड, ड्रायव्हींग लायसन्, विज / टेलिफोन देयक, घरपटटी आदीं पैकी कोणताही एक पुरावा निवासी पुराव्याकरीता ग्राहय धरण्यात येणार आहे. निवासी पुरावा म्हणुन गॅसबुक रदद करण्यात आले आहे. यापैकी निवासाबाबत पुरावा नसल्यासच दुय्यम निबंधक कार्यालयाचा नोंदणीकृत भाडे करार ग्राहय धरण्यात येणार आहे. भाडे करार हा फॉर्म भरण्याच्या दिनांकाच्या पुर्वीचा व त्याचा कालावधी एक वर्षाचा असणे बंधनकारक आहे.
सन 2022-23 या शैक्षणिक वर्षामध्ये आर.टी.ई. अंतर्गत प्रवेश घेतांना उत्पन्नाचा पुरावा म्हणुन सन 2020-21 किंवा 2021-22 या वर्षाचा पालकांचा उत्पन्नाचा दाखला ग्राहय धरण्यात येणार आहे. उत्पन्नाचा दाखला तहसिलदाराचा असणे बंधनकार राहील. तसेच सक्षम अधिकाऱ्यांनी प्रमाणीत केलेले जात प्रमाणपत्र त्या-त्या संवर्गातुन अर्ज करणाऱ्या पालकांना बंधनकारक आहे. उत्पनाचा दाखला व जातीचा दाखला परराज्यातील ग्राहय धरण्यात येणार नाही
आरटीई मोफत प्रवेश अंतर्गत दिनांक 22-02-2022 पर्यंत एकुण 152 अर्ज प्राप्त झालेले असुन ऑनलाईन अर्ज सादर करण्याची अंतिम दिनांक 02 मार्च, 2022 राहील. तरी जास्तीत जास्त पालकांनी या संधीचा लाभ् घ्यावा असे आवाहन गटशिक्षणाधिकारी एन.जे. फाळके यांनी केले आहे.
गट शिक्षणाधिकारी
पंचायत समिती, जळगांव जा.
0 Comments