सोयगाव: बिबट्या मृत्यू प्रकरणी एकास अटक ; वनविभागाची कारवाई
✍️ सोयगाव औरंगाबाद प्रतिनिधी सुनील चव्हाण👈
सोयगाव वनपरिक्षेत्रातील जरंडी याठिकाणी लागोपाठ दिनांक २३ व २४ रोजी आढळलेल्या वन्यप्राणी बिबट्याचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी वनविभागाने तपासाची चक्रे फिरवत रविवारी (दि.२७) एका आरोपीस अटक करून त्यास सोयगाव येथील न्यायालय हजर केले असता न्यायालयाने आरोपीला (दि.२ मार्च) पर्यंत तीन दिवसांची वनकोठडी सुनावली आहे. त्यामुळे अवैध शिकार करणाऱ्याचे चांगलेच धाबे दणाणले आहे.
जरंडी शिवारात आढळलेल्या दोन्ही बिबट्याचा विषबाधेतून मृत्यू झाला असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यादिशेने वनविभागाने आपला मोर्चा वळविला असून एका आरोपीस रविवारी अटक केली आहे. वनविभागाचा योग्य दिशेने वाटचाल होत असल्याचे सूत्रांनी सांगितले. सदर प्रकरणी वनविभाग लवकरच मुख्य सूत्रधार गजाआड करण्याची शक्यता वर्तवली जात आहे
मादी बिबट्याचा जीव वाचविण्याचा वनविभागा प्रयत्न अयशस्वी:-
दि.२४ फेब्रुवारी मरणासन्न अवस्थेत आढळलेल्या बिबट्यास वनविभागाने तातडीने सोयगाव येथे हलवून तीन तज्ञ डॉक्टरांना पाचारण केले होते. तसेच औरंगाबाद, जळगाव येथून औषधे उपलब्ध करीत ऑक्सिजन सिलेंडर, तातडीने हलविण्यासाठी मोबाईल व्हॅन, आवश्यक संसाधने इ डॉक्टरांना उपलब्ध करून दिले होते. यावेळी डॉक्टरांनी अथक परिश्रम घेत बिबट्याचा जीव वाचविण्याचा प्रयत्न केला होता मात्र त्यास यश आले नाही.
दरम्यान उपचारादरम्यान अखेर बिबट्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.
दोन दिवसात लावला आरोपींचा छडा :-
दोन बिबट्याच्या मृत्यूचे घाव वनाधिकाऱ्यांच्या काळजावर कोरल्या गेल्यामुळे वनविभागाने वेगवान चक्रे फिरवून ४८ तासातच
आरोपींचा शोध लावत अटक करून ताब्यात घेतले.
0 Comments