सोयगाव : तालुक्यात सर्वप्रथम सीसीटीव्ही केमरे बसविणाऱ्या गोंदेगावचा ईतर ग्रामपंचायतींनी आदर्श घ्यावा- सपोनि सुदाम शिरसाट
सोयगाव औरंगाबाद प्रतिनिधी सुनील चव्हाण
तालुक्यात सर्वप्रथम सीसीटीव्ही केमरे बसविण्याचा मान गोंदेगावने मिळविला असून त्यांचा आदर्श इतरही गावांनी घेण्याचा सूचक विचार सोयगाव पोलीस स्टेशनचे सपोनि सुदाम शिरसाट यांनी गोंदेगाव येथे मंगळवारी (दी.२२) व्यक्त केले.
गोंदेगाव ग्राम पंचायतीने गावातील बाजारपेठ, व प्रमुख चौकात व्यापारी व जनतेच्या सुरक्षेसाठी केमरे बसविले आहेत. या केमऱ्यांचा प्रारंभ सपोनि सुदाम शिरसाट यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी व गुन्हेगारांना शोधण्यासाठी सीसी टीव्ही हे प्रभावी माध्यम असल्याने अनेक गुन्हे घडण्यापासून जनतेची सुरक्षा होते.त्यामुळे गोंदेगावचा आदर्श तालुक्यातही इतरही गावांनी घेऊन गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन शिरसाट यांनी यावेळी केले.
यावेळी सरपंच वनमाला शरद निकम, उपसरपंच दीपक अहिरे, ग्रामसेवक श्रीकांत पाटील, तलाठी चांदेकर अप्पा, ग्राम पंचायत सदस्य गौरव विंदवाल, अतुल बोरसे, दिपक खोडके, विजय नगरे,प्रशांत चौधरी, दिलीप पवार, विजय सोनवणे, मनीषा ईश्वर ढाकरे,बापू ढाकरे, वाल्मिक निकम, दिलीप पवार, योगेश देसले, हिम्मत कोळी, ईश्वर अहिरे यांच्यासह डॉ. प्रमोद महालपुरे, चेअरमन अशोक पाटील, माजी सरपंच भारत अहिरे, आबाराव चौधरी, पोलीस पाटील मनोज निकम, याच्यासह गावातील प्रतिष्ठित नागरिक, पोलीस कर्मचारी व ग्रामस्थांची उपस्थिती होती.
फोटो ओळ :- सोयगाव - गोंदेगाव येथे ग्राम पंचायतीच्या वतीने लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही केमऱ्यांचा शुभारंभ करून मार्गदर्शन करतांना सपोनि सुदाम शिरसाट व उपस्थित मान्यवर
0 Comments