Advertisement

भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळशिरस चे आमदार राम सातपुते यांच्याकडून माळशिरस तालुक्यातील सर्वसामान्य, गोरगरीब व गरजू रुग्णांना पुणे मुंबई सारख्या शहरांमध्ये हॉस्पिटलमध्ये लाखो रुपये खर्चाची ऑपरेशन मोफत

भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळशिरस चे आमदार राम सातपुते यांच्याकडून माळशिरस तालुक्यातील सर्वसामान्य, गोरगरीब व गरजू रुग्णांना पुणे मुंबई सारख्या शहरांमध्ये हॉस्पिटलमध्ये लाखो रुपये खर्चाची ऑपरेशन शस्त्रक्रिया आजारपणाशी निगडीत विविध गोष्टी सहज सुलभ आणि मोफत उपलब्ध होत आहेत. त्यामुळे माळशिरस तालुक्यातील जनतेकडून आमदार राम सातपुते यांच्याबद्दल सहानुभूती व्यक्त होत आहे. माळशिरस येथील ज्ञानेश पांडुरंग राऊत यांनी दैनिक पुढारीशी बोलताना सांगितले की मी सर्वसामान्य कुटुंबातील आहे माझ्या वडिलांच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया करण्यासाठी तीन लाख रुपयांची गरज असताना पैशाअभावी हे उपचार राहून गेले होते. ही माहिती आमदार सातपुते यांना समजल्यानंतर त्यांनी तात्काळ आमच्या कुटुंबियांना संपर्क केला तुम्ही खर्चाची अजिबात काळजी करू नका पुणे येथील दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल किंवा मुंबई फाईन हॉस्पिटल या ठिकाणी उपचार घ्या मुंबई याठिकाणी तीन लाख रुपयाचे ऑपरेशन करून दिले व त्याठिकाणी पेशंटला भेटायला आले. तसेच मेडद येथील पै. वैभव बाळासाहेब लवटे यांच्या खांद्याला दुखापत झाली होती. असे असताना त्यांच्या खांद्यावर शस्त्रक्रिया पुणे येथील दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये आमदार राम सातपुते यांच्या माध्यमातून झाली याही ठिकाणी आमदार राम सातपुते पेशींना भेटण्यासाठी गेले. आमदार सातपुते यांनी माळशिरस तालुक्यातील अनेक रुग्णांना आपल्या माध्यमातून मोफत वैद्यकीय उपचार उपलब्ध करून दिले आहेत. गेल्या चार वर्षापासून आमदार सातपुते माळशिरस तालुक्यातील रुग्णांना पुणे मुंबईसारख्या मोठ्या शहरांमध्ये मोफत वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देत आहेत. कोरोनाचा काळ आला अन् सर्वसामान्य जनतेची आर्थिकतेचे कंबरडे मोडले गेले आहे. बहुतांश नागरिक हे सर्वसामान्य कुटुंबातील कोणतेही आर्थिक साधन उपलब्ध नसणारे आहेत त्यामुळे दुर्धर व जादा खर्चिक आजार आहेत. या आजारांवर उपचार करण्यासाठी रुग्ण हालचाली करत नाहीत. आजार अंगावर काढतात नेमकी हीच परिस्थिती लक्षात घेऊन आमदार राम सातपुते यांनी रुग्णांवर  शासकीय योजनेचा लाभ मिळवून देत उपचार करून दिले आहेत. त्यामुळे माळशिरस तालुक्यातील सर्वसामान्य जनतेमधून आमदार राम सातपुते यांच्या कामाबद्दल समाधान व्यक्त केले जात आहे.

Post a Comment

0 Comments