Advertisement

*शिवसेनेच्या शिवसंपर्क अभियान अंतर्गत सोयगाव तालुक्यात बैठक संपन्न*

 *शिवसेनेच्या शिवसंपर्क अभियान अंतर्गत सोयगाव तालुक्यात बैठक संपन्न*




         फर्दापुर ( प्रतिनिधी ) दि.24, मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार शिवसंपर्क अभियान अंतर्गत गुरुवार ( दि.24 ) रोजी सिल्लोड - सोयगाव मतदारसंघात येणाऱ्या फर्दापुर ठिकाणी पंचायत समिती गण निहाय बैठक घेण्यात आली. या अभियानास प्रचंड प्रतिसाद मिळाला.


यावेळी पक्षनिरीक्षक विनायक सामंत, बाळकृष्ण ढमाळे, सोयगांव तालुका प्रमुख प्रभाकरराव काळे, सिल्लोड तालुका प्रमुख देविदास लोखंडे, श्रीमती दुर्गाताई पवार, जि.प.सदस्य गोपीचंद जाधव, रघुनाथ घडमोडे यांची प्रमुख उपस्थिती होती.


    

शिवसेनेचा विचार आणि उद्धवसाहेब ठाकरे यांनी घेतलेले जनहितार्थ निर्णय तसेच राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी केलेले विकासकामे घरोघरी पोहचवून येणाऱ्या जिल्हा परिषद , पंचायत समितीच्या निवडणुकीत भगवा फडकविण्यासाठी शिवसैनिकांनी सज्ज व्हावे असे आवाहन पक्षनिरीक्षक विनायक सामंत यांनी केले.


बैठकीस उस्मानखा पठाण, माजी सभापती धरमसिंग चव्हाण, विलास वराडे, रविंद्र बावस्कर, सरपंच विनोद जाधव, राजू रेकनोद, शेख जाकेर, भीमराव बोराडे, शेख फारुख, राजेश दिंडे, नामदेव सोंने, मनोज शेवगण, श्रावण जाधव, हिरा चव्हाण, उमरखा पठाण, राजू रेकनोद, शेख सत्तार, दारासिंग चव्हाण, दीपक आगळे, विजय तायडे,मगन जाधव, राहुल दामोदर, इम्रान शहा, अशोक पाटील, राजू बलांडे, कासम पठाण, शेख मुक्तार आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments