Advertisement

फर्दापूर पोलिस स्टेशन मध्ये आज रोजी स्वागत व निरोप समारंभ कार्यक्रम आयोजित करण्यात आले

 फर्दापूर पोलिस स्टेशन मध्ये आज रोजी स्वागत व निरोप समारंभ कार्यक्रम आयोजित करण्यात आले



सोयगाव औरंगाबाद प्रतिनिधी सुनील चव्हाण


फर्दापूर पोलिस स्टेशन चे सहा पोलिस निरीक्षक अमोल मोरे यांची देवगाव रंगारी येथे बदली झाली असल्याने फर्दापूर पोलिस स्टेशन मध्ये सहा पोलिस निरीक्षक देविदास वाघमोडे यांनी पदभार स्वीकारला असून यावेळी गावातील प्रतिष्ठित नागरिक, व्यवसायिक, पत्रकार, पोलिस पाटील, पोलिस कर्मचारी उपस्थित होते यावेळी सहा पोलिस निरीक्षक अमोल मोरे यांनी सांगितले की आमच्या बदल्या नेहमी होत राहतात परंतु फर्दापूर पोलिस स्टेशन सारखे कुठे ही पोलिस स्टेशन सापडणार नाही कारण की या ठिकाणी निसर्ग रम्य वातावरणात आहे तसेच जगप्रसिद्ध अजिंठा लेणी आहे तसेच या पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या गावांची नागरिक खूप चांगले आहेत तसेच सहकार्य हि चांगल्या प्रकारे करतात असे बोलून ते भावनिक झाले होते तरी साहेब यांना पुष्पगुच्छ शाल श्रीफळ देऊन निरोप देण्यात आला

Post a Comment

0 Comments