Advertisement

वडजी आणि दुधलगाव या दोन्ही गावांना तात्काळ पशुसंवर्धनासाठी डॉक्टर उपलब्ध करून घ्या : नंदुभाऊ लवंगे*

 *वडजी आणि दुधलगाव या दोन्ही गावांना तात्काळ पशुसंवर्धनासाठी डॉक्टर उपलब्ध करून घ्या : नंदुभाऊ लवंगे*



वडजी येथे श्रेणी 2 चा पशुसंवर्धन दवाखाना आहे व त्या ठिकाणी असण्याच्या डॉक्टरांना दुधलगाव बु येथे आठवळ्यातुन एक दिवस व्हिजिट देऊन दवाखान्या संदर्भात कामकाज पाहावे लागते परंतु वडजी येथील दवाखान्यात कोणीही कायमस्वरूपी डॉक्टर नाही यामुळे वडजी आणि दुधलगाव या गावांना त्यांची  पाळीव जनावरे आजारी पाळल्यास उपचार करण्यासाठी अडचणी येतात ग्रामीण भागात शेतीला जोड धंदा म्हणून शेतकरी पाळीव प्राणी जास्तीत जास्त ठेवत असतात परंतु त्यांना प्राण्यांवर येणाऱ्या विविध साथीच्या आजारांना तोंड द्यावं लागते अश्या परिस्थितीत जर सरकारी डॉक्टर नसतील तर सर्वच लोकांना त्यांच्या जनावरांवर उपचार करणे शक्य नसते ही बाब ऑल इंडिया मल्हार नवयुवक सेनेच्या लक्षात येताच ऑल इंडिया मल्हार नवयुवक सेना प्रदेशाध्यक्ष नंदुभाऊ लवंगे यांनी जिल्हा परिषद बुलढाणा येथे जाऊन या गावांना लवकरात लवकर डॉक्टर उपलब्ध करून घ्या अश्या प्रकारचे निवेदन दिले डॉक्टर उपलब्ध न झाल्यास डॉक्टर अभावी गावामध्ये जर शेतकऱ्यांच्या जनावरांचा मृत्यू झाला तर याला सर्वस्वी जवाबदार सम्बधित अधिकारी राहतील असेही त्यांनी सांगितले यावेळी रामभाऊ जुंबळे , सागर चिंचोलकर, गणेश सुशिर उपस्थित होते

Post a Comment

0 Comments