*बापू

मिया सिराजोद्दीन पटेल महाविद्यालयामध्ये अंतर महाविद्यालयीन हॉलीबॉल मुलींच्या स्पर्धेचे आयोजन...*
जळगांव जा.प्रतिनिधी:-
स्थानिक पिंपळगाव काळे, येथील बापुमिया सिराजोद्दीन पटेल कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय व संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती द्वारा अंतर महाविद्यालयीन क्रीडा स्पर्धा झोन - C हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन दिनांक 13 ऑक्टोबर 2022 रोजी करण्यात आले. सदरील कार्यक्रमांमध्ये कार्यक्रमाचे अध्यक्ष ॲड. सलीम पटेल साहेब अध्यक्ष सातपुडा शिक्षण व ग्रामीण विकास संस्था पळसी वैद्य हे होते. तसेच कार्यक्रमाचे उद्घाटक प्रो. डॉ. प्रदीप खेडकर सर डायरेक्टर ऑफ फिजिकल एज्युकेशन अँड स्पोर्ट नरसम्मा कॉलेज अमरावती हे होते. कार्यक्रमाची सुरुवात कार्यक्रमाचे उद्घाटक डॉ. प्रदीप खेडकर सर यांच्या हस्ते रेबीन कापून तसेच क्रीडांगणाची पूजा करून करण्यात आली. यानंतर सहभागी खेळाडूद्वारे मार्च पास करण्यात आले. या स्पर्धेमध्ये अमरावती विद्यापीठातील विविध ठिकाणच्या नऊ संघांनी सहभाग घेतला आहे.आपल्या उद्घाटनिय भाषणामध्ये प्रोफेसर प्रदीप खेडकर सर यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना, महाविद्यालयीन जीवनामध्ये खेळांचे महत्त्व सांगितले. तसेच ग्रामपंचायत क्षेत्रामधील महाविद्यालयीन स्तरावर या प्रकारच्या स्पर्धेचे भव्य आयोजन आपण प्रथमच बघत आहोत असे प्रतिपादन केले. यासोबतच शहरी भागातील खेळाडूंसोबतच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त खेळांमध्ये सहभाग घ्यावा असे सांगितले.
आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये संस्थेचे अध्यक्ष ॲड. सलीम पटेल सर यांनी खेळाडूंबद्दल बोलताना स्वतःमधील क्षमता ओळखून खेळाडू बनतात, अनेक पराभव पचवून खेळाडू विजय मिळवतो, कठीण परिस्थितीतून जिद्दीने व कौशल्याने सामना जिंकून देतो तोच खरा खेळाडू असतो असे सांगितले. सदर कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून रब्बानी देशमुख सर सहसचिव सातपुडा शिक्षण व ग्रामीण विकास संस्था, चंद्रकांत इलग सर आंतरराष्ट्रीय धनुर्विद्या कोच हे होते.सोबतच कार्यक्रमासाठी कय्युम पटेल सर डायरेक्टर सातपुडा शिक्षण व ग्रामीण विकास संस्था, सिराज पटेल सर, श्रीमती प्रवीण देशमुख मॅडम संचालिका, डॉ
आय. ए. राजा प्राचार्य कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, एम. बी. इंगळे प्राचार्य कनिष्ठ महाविद्यालय, डॉ.प्रमोद चव्हाण सर, डॉ. अजमेरे सर, डॉ. अरुण हरणे सर, डॉ. सुनील आखरे सर, डॉ. निलेश कडू सर, डॉ. मनोज व्यवहारे सर, डॉ. कैलास पवार सर, डॉ. प्रवीण डाबरे सर, डॉ. पी व्ही पिंगळे सर, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य अतुल उगले सर, वरिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. चेतन पलन व डॉ. नूर मोहम्मद तसेच सामाजिक कार्यकर्ते निलेश भाऊ भोपळे उपस्थित होते. कार्यक्रमांमध्ये महाविद्यालयीन मुलींचे लेझीम पथक व बँड पथक यांनी मान्यवरांचे स्वागत केले तसेच संगीत विभागातील समूह गायनाच्या मुलींनी स्वागत गीत गाऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शारीरिक शिक्षण व क्रीडा विभाग प्रमुख डॉ. बाबाराव सांगळे व आभार प्रदर्शन डॉ. आनंद जाधव यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी अथक परिश्रम घेऊन सदर कार्यक्रम यशस्वी केला.*बापूमिया सिराजोद्दीन पटेल महाविद्यालयामध्ये अंतर महाविद्यालयीन हॉलीबॉल मुलींच्या स्पर्धेचे आयोजन...*
जळगांव जा.प्रतिनिधी:-
स्थानिक पिंपळगाव काळे, येथील बापुमिया सिराजोद्दीन पटेल कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय व संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती द्वारा अंतर महाविद्यालयीन क्रीडा स्पर्धा झोन - C हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन दिनांक 13 ऑक्टोबर 2022 रोजी करण्यात आले. सदरील कार्यक्रमांमध्ये कार्यक्रमाचे अध्यक्ष ॲड. सलीम पटेल साहेब अध्यक्ष सातपुडा शिक्षण व ग्रामीण विकास संस्था पळसी वैद्य हे होते. तसेच कार्यक्रमाचे उद्घाटक प्रो. डॉ. प्रदीप खेडकर सर डायरेक्टर ऑफ फिजिकल एज्युकेशन अँड स्पोर्ट नरसम्मा कॉलेज अमरावती हे होते. कार्यक्रमाची सुरुवात कार्यक्रमाचे उद्घाटक डॉ. प्रदीप खेडकर सर यांच्या हस्ते रेबीन कापून तसेच क्रीडांगणाची पूजा करून करण्यात आली. यानंतर सहभागी खेळाडूद्वारे मार्च पास करण्यात आले. या स्पर्धेमध्ये अमरावती विद्यापीठातील विविध ठिकाणच्या नऊ संघांनी सहभाग घेतला आहे.आपल्या उद्घाटनिय भाषणामध्ये प्रोफेसर प्रदीप खेडकर सर यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना, महाविद्यालयीन जीवनामध्ये खेळांचे महत्त्व सांगितले. तसेच ग्रामपंचायत क्षेत्रामधील महाविद्यालयीन स्तरावर या प्रकारच्या स्पर्धेचे भव्य आयोजन आपण प्रथमच बघत आहोत असे प्रतिपादन केले. यासोबतच शहरी भागातील खेळाडूंसोबतच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त खेळांमध्ये सहभाग घ्यावा असे सांगितले.
आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये संस्थेचे अध्यक्ष ॲड. सलीम पटेल सर यांनी खेळाडूंबद्दल बोलताना स्वतःमधील क्षमता ओळखून खेळाडू बनतात, अनेक पराभव पचवून खेळाडू विजय मिळवतो, कठीण परिस्थितीतून जिद्दीने व कौशल्याने सामना जिंकून देतो तोच खरा खेळाडू असतो असे सांगितले. सदर कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून रब्बानी देशमुख सर सहसचिव सातपुडा शिक्षण व ग्रामीण विकास संस्था, चंद्रकांत इलग सर आंतरराष्ट्रीय धनुर्विद्या कोच हे होते.सोबतच कार्यक्रमासाठी कय्युम पटेल सर डायरेक्टर सातपुडा शिक्षण व ग्रामीण विकास संस्था, सिराज पटेल सर, श्रीमती प्रवीण देशमुख मॅडम संचालिका, डॉ
आय. ए. राजा प्राचार्य कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, एम. बी. इंगळे प्राचार्य कनिष्ठ महाविद्यालय, डॉ.प्रमोद चव्हाण सर, डॉ. अजमेरे सर, डॉ. अरुण हरणे सर, डॉ. सुनील आखरे सर, डॉ. निलेश कडू सर, डॉ. मनोज व्यवहारे सर, डॉ. कैलास पवार सर, डॉ. प्रवीण डाबरे सर, डॉ. पी व्ही पिंगळे सर, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य अतुल उगले सर, वरिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. चेतन पलन व डॉ. नूर मोहम्मद तसेच सामाजिक कार्यकर्ते निलेश भाऊ भोपळे उपस्थित होते. कार्यक्रमांमध्ये महाविद्यालयीन मुलींचे लेझीम पथक व बँड पथक यांनी मान्यवरांचे स्वागत केले तसेच संगीत विभागातील समूह गायनाच्या मुलींनी स्वागत गीत गाऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शारीरिक शिक्षण व क्रीडा विभाग प्रमुख डॉ. बाबाराव सांगळे व आभार प्रदर्शन डॉ. आनंद जाधव यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी अथक परिश्रम घेऊन सदर कार्यक्रम यशस्वी केला.
0 Comments