
राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका राष्ट्रीय समाज पक्ष स्वबळावर लढविणार….
…………..माजी मंत्री महादेव जानकर
राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका राष्ट्रीय समाज पक्ष स्वबळावर लढणार असून त्याअनुषंगाने कार्यकर्त्यांनी तयारी करावी असे जाहीर आव्हान माजी मंत्री महादेव जानकर नागपूर मधील कार्यकर्ता आढावा बैठकीत केलें. अशी माहिती नागपूर लोकसभा प्रभारी तथा नागपूर शहर अध्यक्ष डॉ. अनंत नासनूरकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात केलें आहे.
यावेळी कोयला खदान अन्यायग्रस्त शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष प्रा. बाबा टेकाडे आणि कार्यकर्त्यांनी माजी मंत्री जानकर यांना निवेदन देवून सावनेर तालुक्क्यातील अन्यायग्रस्त शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याकरीता शासन दरबारी मुद्दा लावून धरावा अशी विनंती केली.
या बैठकीला राष्ट्रीय समाज पक्षाचे विदर्भ प्रदेश अध्यक्ष तथा रामटेक लोकसभा प्रभारी प्रा. ऍड. रमेश पिसे, रासप विदर्भ संपर्क प्रमुख तथा गडचिरोली लोकसभा प्रभारी कृषी सम्राट राजेंद्र पाटील, नागपूर लोसभा प्रभारी तथा शहर अध्यक्ष डॉ. अनंत नासनूरकर, विदर्भ मुख्यमहासचिव संजय कन्नावार,सचिव रामदास माहुरे, कोषाध्यक्ष पुरुषोत्तम कामडी,नागपूर शहर मुख्य सचिव डॉ. प्रशांत
शिंगाडे, सचिव देविदास आगरकर, उपाध्यक्ष डॉ. अरुण चुरड, दक्षिण नागपूर विधानसभा अध्यक्ष डॉ. ज्ञानेश्वर वघरे, पूर्व नागपूर विधान सभा संघटक डॉ. दादाराव इंगळे, डॉ.किशोर सुरडकर, मनोज वाडेकर, धर्मेंद्र टेकाडे, सुनील शेंडे ,अतुल पांडे, भंडाऱ्याचे स्वरूप रामटेकेमंगेश कपाटे, , नागपूर जिल्हा परिषदेचे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष पुरुषोत्तम डाखोळे, कोयला खदान अन्यायग्रस्त शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष प्रा. बाबा टेकाडे, शरद टेकाडे, बाबाराव भोंगाडे, शुभम खोडके, कुलदीप बोधें, प्रकाश भुजाडे, रोशन भुजाडे, विजय भुजाडे, निखिल साखरे आदी मान्यवर उपस्तित होते.
0 Comments