*मौर्य कांती महासंघ*
महाराष्ट्र राज्य सत्यशोधक समाज स्थापनेच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त मौर्य क्रांती महासंघ आयोजित *विभागीय प्रशिक्षण शिबिर*

1 जानेवारी 2023 रोजी श्री शिवाजी हायस्कूल वाशिम येथे संपन्न झाले. या कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून मौर्य क्रांती महासंघाचे अध्यक्ष *मा. बलभीम माथेले* सर प्रमुख उपस्थिती श्री शिवाजी हायस्कूल वाशिम येथील प्राचार्य *मा.श्री अरुणराव सरनाईक* त्याचबरोबर या विभागीय प्रशिक्षण शिबिरासाठी उद्घाटक म्हणून *मा.ॲड.एस. एन. वैद्य साहेब* जिल्हा व सत्र न्यायालय वाशिम, *मा.एकनाथभाऊ भिवटे बुलढाणा, मा.डॉ गजानन हुले, मा.ज्ञानेश्वरभाऊ मुखमाले, मा.सुरेशभाऊ मुखमाले , मा.एकनाथभाऊ कष्टे, मा.सदानंदभाऊ मस्के, मा.मदनभाऊ तिरके, मा.समाधानभाऊ गायकवाड,बुलढाणा, मा.प्रकाशभाऊ इंगळे*,यांच्यासह या विभागीय प्रशिक्षणासाठी अकोला, बुलढाणा, वाशिम ,अमरावती आणि यवतमाळ या जिल्ह्यातील बहुसंख्य विविध संघटनेचे पदाधिकारी तसेच समाजातील बुद्धिजीवी वर्ग शिक्षक,प्राध्यापक,डॉक्टर,वकील, इंजिनियर विद्यार्थी ,युवा,धनगर समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक *श्री पी.एम. कुटे* मौर्य क्रांती महासंघ उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य यांनी केले त्यानंतर या कार्यक्रमांमध्ये वाशिम नगरपरिषदेचे नगरसेवक *मा. श्री बाळूभाऊ मुरकुटे* तसेच *मा.श्री एम.जी बोरकर* सर त्याचबरोबर प्राध्यापक *मा. श्री मा.सचिन मुखमाले* सर यांनी आपले विचार व्यक्त केले त्यानंतर मौर्य क्रांती महासंघाची कार्यप्रणाली आणि मौर्य क्रांती महासंघाचा उद्देश विचारधारा आणि भविष्यातील विविध कार्यक्रम याबाबत *मा. श्री बलभीम माथेले* सर यांनी आपल्या दिवसभराच्या प्रशिक्षणातून उपस्थित असलेल्या बांधवांपर्यंत मौर्य क्रांती महासंघ बाबत माहिती दिली.मौर्य क्रांती महासंघ *एकट्याने नाही तर एकीने लढूया* या सिद्धांतावर काम करण्यास कटिबद्ध आहे.मौर्य क्रांती महासंघ भविष्यातील विविध कार्यक्रम बाबत सखोल मार्गदर्शन केले.मौर्य क्रांती महासंघ हे एक केवळ आणि केवळ कॅडर बेस सामाजिक राष्ट्रव्यापी संघटन आहे. याबाबत अनमोल मार्गदर्शन त्यांनी केले.प्रशिक्षण शिबिराबाबत याप्रसंगी विविध जिल्ह्यातून आलेल्या आणि समाजाशी वेळ, बुद्धी,कौशल्य, परिश्रम आणि निधी देण्याची भावना जागृत झालेल्या बांधवांना नियुक्ती देण्यात आल्या.त्यामध्ये *मा.भगवानराव कोल्हे* यांची मौर्यक्रांती महासंघाच्या राज्य सदस्य पदी नियुक्ती करण्यात आली.वाशिम जिल्हा अध्यक्ष मौर्य क्रांती महासंघ *मा.इंजि.श्री विठ्ठल गोरे* सर यांची नियुक्ती करण्यात आली. त्याचबरोबर वाशिम जिल्हा मौर्यक्रांती महासंघ समन्वयक *मा.ॲड.एस.एन.वैद्य* सर जिल्हा व सत्र न्यायालय वाशिम यांची नियुक्ती करण्यात आली.बुलढाणा जिल्हा अध्यक्ष *मा.अशोक भिवटे* यांची नियुक्ती करण्यात आली. त्याचबरोबर जिल्हा समन्वयक बुलढाणा *मा.विजय भाऊ वसतकार* जळगाव जामोद अध्यक्ष *मा.सुनील भिवटे* सर, मौर्य क्रांती महासंघ नांदुरा शहराध्यक्ष म्हणून *मा.राज अर्जुन सुसरे* सर,मौर्य क्रांती महासंघ शहर उपाध्यक्ष नांदुरा *मा.अर्जुन अभिमन्यू वसतकार* सर तसेच अकोला जिल्हा अध्यक्षपदी *मा.श्री संजय गव्हाळे* सर, मौर्य क्रांती महासंघ अकोला जिल्हा म्हणून *मा. शंकरभाऊ पारेकर* आणि बाळापुर तालुका अध्यक्ष *मा.संतोषभाऊ कात्रे* सर यांची निवड करण्यात आली आणि त्यांना मौर्य क्रांती महासंघाचे संस्थापक अध्यक्ष यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन त्यांचे अभिनंदन केले.भविष्यात मौर्य क्रांती महासंघ हे समजातील विविध संघटनांना सोबत घेऊन काम करेल मौर्य क्रांती महासंघ ची विचारसरणी चा प्रचार आणि प्रसार ,वाढ आणि विस्तार मोठ्या प्रमाणात होईल असा विश्वास व्यक्त केला.कार्यक्रम स्थळी मौर्य क्रांती महासंघ च्या वतीने *मा.हनुमंत दवंडे* सर यांच्या सहकार्याने बुक स्टॉल लावण्यात आले होते .आलेल्या समाज बांधवांनी मोठ्या प्रमाणात महापुरुषांची माहितीपर पुस्तके खरेदी केली. या विभागीय प्रशिक्षण शिबिरासाठी विदर्भातील विविध संघटनांचे पदाधिकारी तसेच बहुसंख्य धनगर समाज बांधव उपस्थित होते. या विभागीय प्रशिक्षण शिबिराबाबत *मा.डॉ.के.एन.हुले* आजेगाव यांनी प्रथमच आशा प्रकारचे सामाजिक प्रशिक्षण करण्याचा योग आला,तसेच अशा पद्धतीने आणि महापुरुषांच्या विचारधारेला धरून चालणारे एकमेव संघटन असून भविष्यात मौर्य क्रांती महासंघ राष्ट्रव्यापी संघटन म्हणून उदयास येईल अशा शुभेच्छा दिल्या.प्रशिक्षण शिबिराचं संचलन मौर्य क्रांती महासंघाचे विभाग प्रभारी *मा.राजकुमार नव्हाळे* सर यांनी केले तर आभार प्रदर्शन मौर्य क्रांती महासंघाचे *मा.श्री शिवाजी वैद्य* सर यांनी केले.*मौर्य कांती महासंघ*
.
0 Comments