*नायलॉन मांजा धाग्याचा साठा जप्त करा अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयात पतंग महोत्सव*
*संभाजी ब्रिगेड महानगर चा इशारा

*
अकोला ~जानेवारी महिन्यात मकर संक्रांत असल्यामुळे दरवर्षीप्रमाणे शहरात पतंग उडविण्यारया तरुणांचा उत्साह शिंगेला जाते पतंग उडवीत असताना चायना मांजा धागा वापरायचे प्रमाण खूप वाढलेले आहे या धाग्यामुळे अनेक नागरिकांना मोठ्या प्रमाणात दुखापती झाल्या आहेत नुकताच आश्रय नगरातील तीन वर्षीय बालकाचा गळा या धाग्यामुळे कापला आणि गंभीर दुखापत झाली. यामध्ये नागरिकांना आर्थिक शारीरिक फटका सुद्धा बसतो शहरात नायलॉन धागा विक्रेते कोण हे पोलीस विभागात माहिती आहे परंतु पोलीस व महानगरपालिका अर्थपूर्ण तडजोळ करून या प्रकरणाकडे दुर्लक्ष करीत आहेत असं जनसामान्य लोकांना वाटते . या नायलॉन मांजाचे धागेदोरे ग्रामीण भागात सुद्धा पसरले असून आता शहरा बरोबर ग्रामीण भागातही किरकोळ दुखापती व अपघात नायलॉन मांजा मुळे होत आहेत सध्या स्थितीत अकोला महानगरात नायलॉन मांजा चा खूप मोठ्या प्रमाणात साठा असून या साठेबाजावर कारवाई करून शहरातील नागरिकांना तसेच पक्षांना अभय द्यावे संबंधित विक्रेत्यावर ताबडतोब कारवाई करून नायलॉन मांजा धागा जप्त करण्यात यावा अन्यथा संभाजी ब्रिगेड तर्फे जिल्हाधिकारी कार्यालय तसेच पोलीस अधीक्षक कार्यालय परिसरात मकर संक्रांतीच्या दिवशी पतंग महोत्सवाचे आयोजन करेल याची सर्वस्वी जबाबदारी शासनाची राहील अशा गंभीर विषयाची निवेदन आज संभाजी ब्रिगेडचे महानगर जिल्हा प्रमुख योगेश ढोरे यांच्या नेतृत्वात अकोला जिल्हाधिकारी साहेब व पोलीस अधीक्षक साहेब यांना देण्यात आले .
निवेदन देत्यावेळी संभाजी ब्रिगेडचे जिल्हा महानगर अध्यक्ष योगेश ढोरे,महानगर उपाध्यक्ष पंकज बाजोड, उपशहर प्रमुख संदीप उपर्वट,जिल्हा उपाध्यक्ष मंगेश माकोडे,जिल्हा उपाध्यक्ष देवानंद साबळे, ओम वानखडे, कुशल जैन, सोशल मीडिया प्रमुख हर्ष कुरवाडे, ईश्वर भोयलू,शुभम वाकोळे, चेतन तोडकर, सागर भिरड, हरीश बोन्डे, पवन लाळे, रणजित राजगुरू,मनोज इंगळे,दीपक काटे, परीक्षित ढोरे, रितेश श्रीवास्तव, आदित्य मेहेरे राम ढोरे तसेच संभाजी ब्रिगेड चे कार्यकर्ते उपस्तित होते..
0 Comments