मातोश्री पब्लिक स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न

अविष्कार 2023 मध्ये विद्यार्थ्यांनी सादर केले सुप्त गुण
तालुक्यातील पिंपळगाव काळे येथील झपाट्याने शैक्षणिक प्रगती करणारी व परिसरात एक प्रमुख शैक्षणिक चळवळ उभी करणारी ग्रामीण भागातील एक प्रमुख इंग्रजी शाळा म्हणून मातोश्री पब्लिक स्कूल समोर येत आहे. ह्या शाळेचे स्नेहसंमेलन दरवर्षीनुसार दिनांक 25 फेब्रुवारी 2023 ला पार पडले यावेळी विद्यार्थ्यांकडून अविष्कार 2023 अशा नावाने हा सोहळा संपन्न झाला यामध्ये विद्यार्थ्यांकडून देशभक्तीपर नाटके गीत गायन नृत्यकला वाद्यवृंद पोवाडे व क्रीडाप्रकार असे सप्तरंगांमध्ये हे कार्यक्रम सादर झाले यावेळी उद्घाटन पण कार्यक्रमात उद्घाटक म्हणून सरपंच सौ प्रीती गोपाल तायडे यांची तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून श्री उकडाची गणपतराव सातव अध्यक्ष मातोश्री शिक्षण व क्रीडा प्रसारक मंडळ पिंपळगाव काळे हे होते.
सरस्वती पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात होऊन प्रमुख उपस्थित त्यांनी आपली मते व्यक्त केली यावेळी मंचावर प्रमुख उपस्थिती म्हणून उपसरपंच सौ भारतीताई बांगर, रंजनाताई संतोष ठाकरे माजी पंचायत समिती सभापती, विजय शांताराम बहादरे, अजय वानखडे अध्यक्ष तालुका पालक संघटना, डॉ श्री राजधर सिंह राजपूत, डॉ सचिन सातव संचालक मातोश्री पब्लिक स्कूल, शिवहरी रोजतकार कोषाध्यक्ष मातोश्री स्कूल, रणीत सर, महादेव सातव सचिव मातोश्री पब्लिक स्कूल, प्राचार्य श्री संदीप बाळसर, इत्यादी मान्यवर उपस्थित होते यावेळी मंचावर बोलताना श्री वानखडे व सौ तायडे यांनी आपली मते व्यक्त करताना स्नेहसंमेलन हे विद्यार्थ्यांचे सुप्त गुण विकसित करणारी महत्त्वाची पायरी असल्याचे मत व्यक्त केले त्यावेळी रोजतकार सर यांनी प्रास्ताविक करून संचालन कु अवचार मॅम यांनी तर आभार कु राऊत मॅम यांनी मानले. यावेळी सर्व पालकांनी विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवला कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी संस्थेचे सर्व शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले
0 Comments