Advertisement

लहुजी शक्ती सेना" आरक्षण क्रांती मोटर सायकल रॅलीचे टॉवर चौकात भव्य स्वागत

*"लहुजी शक्ती सेना" आरक्षण क्रांती मोटर सायकल रॅलीचे टॉवर चौकात भव्य स्वागत
* अकोला_ अहिल्या न्यूज 24 प्रतिनिधी शंकर पारेकर लहुजी शक्ती सेना महाराष्ट्र श्री विष्णूंभाऊ कसबे यांनी मातंग समाजाच्या विविध मागण्यावर महाराष्ट्र शासनाचे लक्ष वेधण्यासाठी व त्या पूर्ण करण्यासाठी १० मार्च नाशिक ते २४ मार्च मुंबई आझाद मैदान अश्या महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यातील मातंग समाजामध्ये जनजागृती करीत अण्णाभाऊ साठे यांना भारत रत्न मिळाला पाहिजे,समाजातील सुशिक्षित तरुणांना न्याय,आरक्षण अ ब क श्रेणी प्रमाणे मिळाले पाहिजे,अण्णाभाऊ साठे महामंडळ सुरू करणे अश्या विविध प्रश्न घेवून निघालेल्या आरक्षण मोटर सायकल रॅलीचा मुंबई येथे समारोप होणार आहे.अकोला आगमन प्रसंगी रॅलीचे स्वागत टॉवर चौक येथे मातंग समाज विकास परिषदेच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजक गणेश मानकर यांनी केले,स्वागत कार्यक्रमाचे अध्यक्ष भाजपा नेते, प्रदेश कार्यकारणी सदस्य भाजपा महाराष्ट्र डॉ अशोक ओळंबे होते तर नगरसेवक आशिष पवित्रकार,नगरसेवक हरीशभाई अलिमचंदाणी,नगरसेवक गिरीष गोखले,सुदेश शेळके,गजानन खारोडे प्रामुख्याने उपस्थित होते,कार्यक्रमाचे प्रास्ताविक वामन भिसे यांनी तर आभार विजय बांगर यांनी मानले,यावेळी रॅलीचे प्रमुख विष्णू भाऊ कसबे यांचा सत्कार मान्यवरांच्या वतीने करण्यात येवुन रॅलीला पाठिंबा देण्यात आला कार्यक्रमाला प्रभाकर लांडगे,विष्णू शेलार, लक्ष्मण वानखडे,भाऊराव साबळे,गजानन गोलाईत,नितीन बदरखे,सुरेश जाधव,राहुल तायडे,संतोष नृपनारायण,विठ्ठल मानकर,निलेश जाधव,आकाश धूरधर,संतोष अवचार,रमेश मानकर,महेश जाधव,संतोष नावकार लखन तायडे,गणेश पोलाखडे,राजेश बांगर,निलेश जाधव,गजानन मानकर , सत्येम इंगोले,पिंटू अंभोरे,संतोष कालबागे यांचेसह लोकशाहीरअण्णाभाऊ साठे,लहुजी वस्ताद साळवे यांचे अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments