.ऊसरा बु येथील अंनशरा आणि आयशा यांनी ठेवला 26 वा रोजा
मुस्लीम बांधवांच्या उपवासाचा महिना सध्या सुरू आहे. यालाच 'रमजान'चा अर्थात 'बरकती'चा महिना म्हणतात. मनामनातील दरी कमी करून परस्परांमध्ये स्नेहभाव, सद्भाव वाढविणारा हा महिना. संयम, त्याग, शांती, सहिष्णुता, चांगुलपणा, प्रामाणिकपणा माणसांच्या ठायी रुजविणारा हा महिना आहे.
या महिन्यांमध्ये 26 वा रोजा या दिवसाला खूप महत्त्व आहे या रोजालाच मोठा रोजा असे म्हणतात .ऊसरा बु येथील पोलीस पाटील सैय्यद अयाज सैय्यद महेबुब यांची मुलगी अंनशरा आणि त्यांचे भाऊ यांची मुलगी आयशा यांनी 26 वा रोजा ठेवला.या दोन्ही मुली चे वय सात वर्ष आहे. दिवसभर अन्न आणि पाण्याविना यांनी हा रोजा ठेवला होता.संध्याकाळी अल्लाह ला दूआ मागून 6.48 वाजता दोघीनी उपवास सोडला..
0 Comments