Advertisement

समर्थ कॉलेज ऑफ फार्मसीच्या विद्यार्थ्यांची थ्री डी तारांगण सफारी* जिल्हा प्रतिनिधी याकूब शेख अहिल्या न्यूज

*समर्थ कॉलेज ऑफ फार्मसीच्या विद्यार्थ्यांची थ्री डी तारांगण सफारी* जिल्हा प्रतिनिधी याकूब शेख अहिल्या न्यूज
दी:-24/4/2023 देऊळगावराजा मधील समर्थ कॉलेज ऑफ फार्मसी च्या विध्यार्थनसाथीपोलाद स्टील कंपनी जालना व न्यू सम्राट बिल्डिंग मटेरियल देऊळगावराजा यांच्या संयुक्त विद्यमाने कॉलेजेच्या विद्यार्थ्यांना सूर्यमाळेतील आकाशगंगा, ग्रह तारे यांचे ज्ञान प्राप्त व्हावे या उद्देशाने सूर्यमाला दर्शन हा थ्री डी इफेक्ट कार्यक्रम घेण्यात आला.या प्रसंगी प्राचार्य डॉ. श्री ताठे सर,पोलाद कंपनीचे प्रतिनिधी श्री.स्वप्नील डोईफोडे आदी उपस्तित होते.कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी श्री.मनोजभाऊ कायंदे (जि. प.सदस्य बुलढाणा)व श्री.राजेंद्रजी कोटेचा (संचालक,न्यू सम्राट बिल्डिंग मटेरियल)यांची प्रमुख उपस्थिती होती. विद्यार्थ्यामध्ये जिज्ञासू वृत्ती निर्माण व्हावी व त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा,त्यांना सूर्यमाळेतील ग्रह तारे यांची सखोल माहिती मिळावी या दृष्टीने तारांगण दर्शन कार्यक्रम त्याठिकाणी घेण्यात आला.फार्मसी कॉलेज मधील प्रथम,द्वितीय,तृतीय वर्षातील एकूण 450 विध्यार्थ्यांनी व 30 शिक्षक यांनी कार्यक्रमास सक्रिय सहभाग घेतला.थ्री डी इफेक्ट असलेल्या तंबुत आपल्या सूर्यमालेतील आकाशगंगेचे, ग्रह ताऱ्यांचे,व उपग्रह यांचे कार्य याविषयी माहिती देण्यात आली.ग्रह ताऱ्यांचे तापमान,त्यांची निर्मिती,त्यांची दिवस व रात्र कशी होते असा चित्ताथरारक अनुभव थ्री डी इफेक्ट मार्फत विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी घेतला. याकामी पोलाद स्टील कंपनीचे प्रतिमिधी श्री.देविदास आढाव यांचे मार्गदर्शन लाभले.कार्यक्रमाची सांगत होत असतांना पोलाद स्टील कंपनीचे प्रतिनिधी श्री.स्वप्नील डोईफोडे यांनी विद्यार्थी व उपस्तितांचे आभार मानले.

Post a Comment

0 Comments