*गुडी पाडवा व १४ एप्रिल साठी रास्त भाव दुकानात उपलब्ध "आनंदाचा शिधाचा" लाभ घ्यावा_डॉ ओळंबे*
अखेर आनंदाचा शीधाचे सरकारी रास्त भाव दुकानात वितरण सुरू
अकोला _प्रतिनिधि अहिल्या न्युज 24शंकर पारेकर भाजपा शिवसेना युतीचे मुख्यमंत्री मा एकनाथजी शिंदे साहेब व उपमख्यमंत्री मा देवेंद्रजी फडणविस साहेब यांनी खास गुडी पाडवा व १४ एप्रिल साठी राशन दुकानात "आनंदाचा शिधा" नागरिकांसाठी उपलब्ध केला असून लाभार्थी कार्ड धारकांनी याचा लाभ घ्यावा असे आव्हान ६ "एप्रिल भाजपा स्थापना" दिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात भाजपा नेते डॉ अशोक ओळंबे,प्रदेश कार्यकारणी सदस्य भाजपा महाराष्ट्र यांनी केले. डाबकी रोड येथील गोळे यांचे सरकारी रास्त भाव दुकान येथे आनंदाचा शिधा वितरण कार्यक्रमात ते बोलत होते यावेळी नगरसेवक शशी चोपडे, उपजिल्हाप्रमुख शिवसेना,भाजपा जिल्हा सदस्य संजय चौधरी,भाजपा बूथ प्रमुख गजानन गोलाईत,जेष्ठ नागरिक संघाचे,नारायण उंबरकार,किशोर वडतकर,प्रकाश नानाकदे,विजय मोटे, सुरेश शिरसाट,विक्की दुर्गिया,गवारे,यांची उपस्थिती होती. कार्यक्रमात भाजपा स्थापना दिवसानिमित्त कैलास सदाशिव गोळे यांचा मान्यवरांच्या वतीने स्त्कlर करण्यात आला यावेळी, शोभा होरे,शुभम टोंपे,नामदेव अवतlडे,दशरथ घायवट,सुरेश आठवले,गुंफा आवारे,मार्तंडराव इंगळे,यांनाआनंदाचा शिधाचे वाटप करण्यात आले.
आनंदाचा शिधा वितरण कार्यक्रमाला भाजपा व शिवसेना पक्ष्याचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

0 Comments