Advertisement

मनसेच्या पाठपुरव्याला यश ; जिल्हा सामान्य रुग्णालयातील साहित्य खरेदीची चौकशी

*मनसेच्या पाठपुरव्याला यश ; जिल्हा सामान्य रुग्णालयातील साहित्य खरेदीची चौकशी*
*आरोग्यसेवा उपसंचलकांनी नेमली सहा सदस्यीय समिती* बुलढाणा : कोविड काळात जिल्हा सामान्य रुग्णालयात वैद्यकीय साहित्याची मोठ्या प्रमाणात खरेदी करण्यात आली होती. यामध्ये लाखो रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याची तकार करुन या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करुन संबंधित अधिकारी- कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी मनसेचे तालुकाध्यक्ष अमोल रिंढे पाटील यांनी 12 एप्रिल 2023 रोजी उपसंचालक आरोग्य सेवा अकोला यांच्याकडे केली होती. यासंर्दभात उपसंचालक डॉ. श्रीमती तरंगतुषार वारे यांनी दखल घेवून सहा सदस्यीय अधिकारी- कर्मचाऱ्यांची समिती नेमली असून समितीचा अहवाल आरोग्य सेवा आयुक्तालय मुंबई यांना सादर केला जाणार असल्याची माहिती पत्राद्वारे दिली आहे. अमोल रिंढे पाटील यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले होते की, जिल्हा सामान्य रुग्णालय, बुलडाणा येथे कोविड काळात विविध प्रकरची खरेदी करण्यात आली त्यामधील आयसीयु मध्ये पलंग खरेदी .इतर करण्यात आल्याचे दाखविण्यात आले परंतू ज्या पलंगाची खरेदी त्या विभागमध्ये दाखविण्यात आली ते पलंग त्या ठिकाणी नाहीत. याबाबत 11 जानेवारी 2023 रोजी जिल्हा सामान्य रुग्णालयात पत्राद्वारे विचारणा केली असता त्यांनी कुठल्याही प्रकारची माहिती दिलेली नाही. त्यानंतर 15 फेब्रुवारी 2023 रोजी प्रथम अपील दाखल केल्यानंतर 20 मार्च 2023 तारीख देण्यात आली. मात्र सुनावणी पुढे लांबविण्यात आली.त्यानंतर 28/03/2023 रोजी ज्या विभागाच्या संदर्भात अपील होती त्याच विभागाचे अधिकारी रजेचे अर्ज ना मंजूर असून सुध्दा रजेवरती राहले. तरी जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय साहित्य खरेदीची उच्चस्तरीय चौकशी करून संबंधित अधिकारी, भंडारपाल व कर्मचारी यांच्यावर कठोर कारवाई करावी तसेच शासनाचा हडपलेला निधी वसूल करुन संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना निलंबित करावे. अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना रस्त्यावरती उतरुन तिव्र स्वरूपाचे आंदोलन छेडेल असा इशारा मनसे तालुकाध्यक्ष अमोल रिंढे पाटील यांनी दिला होता.*

Post a Comment

0 Comments