Advertisement

बुऱ्हानपूर कडून नांदुरा कडे जाणाऱ्या बोलेरो गाडीत पकडला 16 लाख 81 हजार 600 रुपयांचा विमल गुटखा नागेश भटकर विशेष जिल्हा प्रतिनिधी बुलढाणा .

बुऱ्हानपूर कडून नांदुरा कडे जाणाऱ्या बोलेरो गाडीत पकडला 16 लाख 81 हजार 600 रुपयांचा विमल गुटखा प्रतिनिधी : मलकापूर 12/7/23 येथे बुऱ्हानपूर कडून नांदुरा कडे जाणाऱ्या पिकप बोलेरो ची तपासणी केली असता त्यात आढळून आला महाराष्ट्रात बंद असलेल्या विमल गुटखा 16 लाख 81,हजार 600 रुपयांचा मलकापूर शहर पोलीस स्टेशनची मोठी कारवाई केली. याबाबत सविस्तर माहिती अशी की पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार पिकप बोलेरो क्रमांक MH. 28 BB 2060 बऱ्हाणपूरकडून नांदुराकडे जात असण्याची माहिती शहर पोलीस स्टेशनला मिळाल्यानुसार सदर गाडीचा पाठलाग केला त्यामध्ये महाराष्ट्रात बंदी असलेल्या विमल गुटखा पकडण्यात आला आहे. त्यामध्ये आरोपी म्हणून अक्रम शेख, अरुण राठोड, शेख सलमान शेख, या तीन आरोपींना पोलिसांनी पकडले आहे तर मलकापूर शहर पोलीस स्टेशन येथे पंचनामा करून पिकअप बोलवले सह 16 लाख 81 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदर कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक कडासने ,अप्पर पोलीस अधीक्षक थोरात, गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली मलकापूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार रत्नपारखी यांच्या सह पीएसआय रोकडे पोलीस कर्मचारी शेले ,भोईटे, आनंद माने यांनी कारवाई केली आहे. तर सदर आरोपी विरुद्ध शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Post a Comment

0 Comments