*धानोरा महासिद्ध येथील 25 वर्षीय तरुणी हरविल्याची जळगाव पोस्टेला तक्रार...
जळगाव जामोद प्रतिनिधी:-
जळगाव जामोद पोलीस स्टेशन हद्दीमध्ये येत असलेल्या धानोरा महासिद्ध येथील 25 वर्षीय तरुणी हरविल्याची तक्रार तिचे वडील गजानन गरबडसिंग कुवारे यांनी दिनांक 12 जुलै रोजी जळगांव जामोद पोलीस स्टेशनला दिली. त्यांची 25 वर्षीय मुलगी मंदा गजानन कुवारे ही तेल्हारा येथे कॉलेजला टीसी घेऊन येते असे सांगून दिनांक 11 जुलै रोजी जळगाव जामोद बस स्टॉप येथे गेली असता तेथून ते कुठेतरी निघून गेली. तिचा कॉलेजमध्ये व तिच्यासोबत शिकत असलेल्या मैत्रिणीकडे व नातेवाईकांकडे शोध घेतला असता ती मिळून आली नाही. तिची उंची पाच फूट तीन इंच असुन रंग गोरा आहे. अंगात काळ्या रंगाचा टॉप व काळ्या रंगाची लेगीज आहे. बांधा सडपातळ असुन पायात काळ्या रंगाचा बुट आहे. ही तरुणी कोठेही मिळून आल्यास जळगाव जामोद पोलीस स्टेशनला संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे पुढील तपास ठाणेदार दिनेश झांबरे यांच्या मार्गदर्शनात पोलीस हेड कॉन्स्टेबल समाधान तायडे करीत आहेत.*
0 Comments