विद्युत शॉक लागून तीन बकऱ्या मृत्युमुखी
शेतकऱ्याचे ४० हजाराचे नुकसान
चंद्रभान झिने देऊळगाव राजा

देऊळगाव राजा : विद्युत तारेचा शॉक लागून तीन बकऱ्या मृत्युमुखी पडल्याची घटना आज (ता.४) तालुक्यातील निमखेड शिवारात घडली. तीन बकऱ्या मृत्युमुखी पडल्याने एका शेतकऱ्याचे सुमारे ४० हजारांचे नुकसान झाले आहे.
याबाबत प्राप्त माहितीनुसार आज दुपारनंतर देऊळगाव राजा,निमखेड, सावखेड भोई परिसरात रिमझिम पावसाला सुरुवात झाली. दरम्यान निमखेड येथील शेतकरी कैलास बाबासाहेब कव्हळे यांच्या तीन बकऱ्या विजेच्या ताराला स्पर्श होऊन शॉक लागून मृत्यू पावल्या.यामध्ये दोन शेळ्या गाभण असल्याने बकऱ्यांच्या पोटातच पिलांचा ही मृत्यू झाला. तीन मोठ्या बकऱ्या विजेचा शॉक लागून मृत्युमुखी पावल्याने कैलास कव्हळे या शेतकऱ्याचे अंदाजे चाळीस हजाराचे नुकसान झाले आहे.दरम्यान आजच्या पावसामुळे तालुक्यात काही नुकसान झाले आहे का याबाबत तहसीलदार श्याम धणमने यांच्याशी संपर्क केला असता विद्युत शॉक लागून निमखेड येथे तीन बकऱ्या मृत्यु पावल्या असल्याची माहिती त्यांनी दिली.संबंधित तलाठी यांना पंचनामा करण्याचे आदेश देण्यात आले आहे असेही त्यांनी सांगितले. तर सरपंच संजय कव्हळे यांनी विद्युत शॉक लागून नव्हे तर विज पडून बकऱ्या ठार झाल्या आहे असा दावा केला आहे. वीज तारेचा शॉक लागून शेळ्यांचा मृत्यू झाला की निमखेड गावात विज पडली हे पोस्टमार्टम रिपोर्ट नंतर कळणार आहे.
0 Comments