Advertisement

शेत नांगरणीच्या वादावरून महिलेस धमकी 2 एका विरुद्ध पोलिसाने केली कारवाई चंद्रभान झिने

शेत नांगरणीच्या वादावरून महिलेस धमकी एका विरुद्ध पोलिसाने केली कारवाई चंद्रभान झिने देऊळगाव राजा : कोर्टाचे आदेश असूनही शेत रस्ता अडविणाऱ्या एका विरुद्ध पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा नोंदविला. याबाबत पोलीस सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार मंदाकिनी भानुदास खंडागळे राहणार सुलतानपूर तालुका देऊळगाव राजा यांनी पोलिसात फिर्याद दिली की आरोपी राजेश सुखदेव खंडागळे राहणार सुलतानपूर याने फिर्यादीस तू नागरणी करू नकोस कोर्टात वाद सुरू आहे असे म्हणून फिर्यादीत शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली.फिर्यादी महिला मंदाकिनी खंडागळे यांच्या तोंडी रिपोर्ट वरून पोलिसांनी आरोपी राजेंद्र सुखदेव खंडागळे याच्याविरुद्ध अदखलपात्र गुन्हा नोंदविला आहे. याबाबत पोलीस तपास करीत आहे.

Post a Comment

0 Comments