Advertisement

गावावर रोगराई येऊ नये म्हणून आषाढी (गुरू) पौर्णिमेला गावाला दुग्ध परीक्रमांचा कार्यक्रम उत्साहात साजरा जामोदात शेकडो वर्षांपासून ची परंपरा कायम_* 2 ​ 3 प्रतिनिधी: नागेश भटकर.

गावावर रोगराई येऊ नये म्हणून आषाढी (गुरू) पौर्णिमेला गावाला दुग्ध परीक्रमांचा कार्यक्रम उत्साहात साजरा जामोदात शेकडो वर्षांपासून ची परंपरा कायम_* प्रतिनिधी: नागेश भटकर.
दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा गावावर कुठलीही रोगराई येऊ नये व रोगराई पसरू नये म्हणून संपूर्ण जामोद गावाला आषाढी पौर्णिमेला दुग्ध परिक्रमा चा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला फार प्राचीन काळापासून जामोद येथे आषाढी गुरुपौर्णिमेला ही अनोखी परंपरा जोपासली जात आहे दिनांक 3 जुलै रोजी सायंकाळी पाच वाजता डोंगरवेस भागातील मरी माता मंदिरात विधीवत पूजा अर्चा करून या कार्यक्रमाला उत्साहात सुरुवात करण्यात आली होती यासाठी छिद्र असलेल्या मातीच्या घागरीत गायीचे शुद्ध दूध टाकतात व ती घागर खांद्यावर घेऊन पूर्ण गाव कुसाच्या बाहेरून चालत अखंड दुधाची धार फिरविण्यात येते सदर दुधाची धार पुरावी म्हणून एकूण सातही गावाच्या वेशीवर सात माणसे गाईच्या दुधाने भरलेली तांब्याची घागरी घेऊन हजरच असतात या मिरवणुकी दरम्यान एका इसमाच्या डोक्यावर मरी माता चे पेटते अग्नीचे धुपारणे असते मिरवणुकीदरम्यान मरी माता की जय असा जयघोष करीत डफड्यांंच्या निनादात गाव परिक्रमा पूर्ण करण्यात येते आणि पूर्ण गावाबाहेरून दुधाची धार फिरून आल्यानंतर डोंगरवेस भागातील हनुमान मंदिरात प्रसाद वाटून कार्यक्रमाची सांगता करण्यात येते अशा प्रकारे दर आषाढी गुरुपौर्णिमेला दुधाची धार फिरविल्याने गावांमध्ये कुठलीच रोगराई पसरत नाही आणि ज्या वर्षी दुधाची धार फिरली नाही त्या वर्षी मात्र गावावर महामारी सारखी रोगराई उद्भभवल्या शिवाय राहत नाही असे आभाल वृद्ध वडील धारी मंडळी सांगतात आणि तसा अनुभव सुद्धा येत असल्याचे सांगण्यात येते फार जुन्या प्राचीन काळापासून जामोद येथे दरवर्षी आषाढी पौर्णिमेला दुधाची धार फिरवण्याची परंपरा अजूनही कायम सुरूच आहे वरील कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्वस्वी पुंडलिक काळपांडे,समाधान दामधर, प्रमोद भोपळे, नामदेव धर्मे,, संदीप दलाल, ,,रमेश हागे , प्रल्हाद फुसे,संतोष बोडखे, ,श्रीराम दामधर , गजानन हांडे, , , तुकाराम धर्मे, मोतीराम धुर्डे, , मनोहर भगत, सुभाष ढगे, अमोल घाटे , ,गजानन ढगे,मारोती फुसे, अमोल भगत, विजु राऊत, कळूभाऊ येळे, सागर बोदडे, प्रतिक उमाळे , यांचेसह असंख्य ग्रामस्थ सहभागी होऊन वरील कार्यक्रम उत्साहात साजरा करतात यावेळी जामोद पोलिस चौकीच्या वतिने चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता

Post a Comment

0 Comments