Advertisement

भरधाव वाहनाच्या धडकेत हरणाचा मृत्यू संग्रामपूर तालुक्यातील घटना* प्रतिनिधी. नागेश भटकर

*भरधाव वाहनाच्या धडकेत हरणाचा मृत्यू संग्रामपूर तालुक्यातील घटना* प्रतिनिधी. नागेश भटकर संग्रामपूर तालुक्यातील सोनाळा ते वारखेड मुख्य रस्त्यावर संग्रामपुर फाटा म्हणून ओळख असलेल्या येथुन काही अंतरावर अज्ञात भरधाव वाहनाने हरीणाला जोरदार धडक दिल्याने त्या हरीणाचा जागेवरच मृत्यू झाला मात्र घटणा झाल्यावर काही तास मृत हरीण जागेवच पडुन होते , सविस्तर असे की संग्रामपूर फाटा जवळ हिवरखेड कडून सोनाळा कडे भरधाव वेगाने येत असलेल्या अज्ञात वाहनाने रस्ता ओलांडणाऱ्या हरीणाला चिरडले त्या धडकेमुळे हरीणाचा जाग्यावर मृत्यू झाल्याची घटना आज दि 03 जुलै रोजी पाहटेच्या सुमारास घडली महत्वाचे म्हणजे ते मृत हरीणाला 12 वाजे पर्यंतच्या सुमारास जागेवरच पडून होते परंतु वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी कोणीही दिसुन आले नव्हते व सर्तकता दाखवली नाही .विशेषतः घटने नंतर मोठ्या प्रमाणावर रहदारीच्या मुख्य रस्त्यावर काही तास हरीण मृत अवस्थेत पडुन असने गंभीर व दुर्दैवी बाब आहे .यामुळे वन विभागाचे किती दुर्लक्षित कार्य होत असल्याचे दिसून येते तसेच वन विभागाच्या या सुमार कार्य प्रणालीवर जनसामान्यांतुन सुर उमटत आहे .

Post a Comment

0 Comments