Advertisement

जळगांव जामोद व संग्रामपूर तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या अनुदानाबाबत आशा पल्लवीत* 2 *बाजार समितीच्या शिफारस ठरावासह धनंजय मुंडे व अब्दुल सत्तार यांना निवेदन* जळगाव जामोद- 5 ​

*जळगांव जामोद व संग्रामपूर तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या अनुदानाबाबत आशा पल्लवीत* *बाजार समितीच्या शिफारस ठरावासह धनंजय मुंडे व अब्दुल सत्तार यांना निवेदन* जळगाव जामोद-
कृषी उत्पन्न बाजार समिती जळगाव जामोद व संग्रामपूर, जि. बुलढाणा येथे दाखल असलेल्या प्रस्तावातील शेतकऱ्यांनी आपला कांदा कृषी उत्पन्न बाजार समिती च्या आवारात व्यवहार झालेला नसल्याचे कारण देऊन सर्व २९४० प्रस्ताव अपात्र ठरविण्यात आल्याबत चे पत्र कृषी उत्पन्न बाजार समिती कडून देण्यात आले होते. परंतु जळगाव जामोद व संग्रामपूर बाजार समिती मध्ये कांदा या शेतमालाची खरेदी-विक्री ची व्यवस्था कार्यन्वित नसल्याने शेतकऱ्यांनी आपला कांदा बाजार समितीच्या अधिकृत परवाना धारक व्यापाऱ्यांनाच विकलेला असुन अनुदान प्रस्तावा सोबत ०१/०२/२०२३ ते ३१/०३/ २०२३ या दरम्यानच्या विक्री पावती, ई-पिक पेरा असलेला ७/१२ व इतर आवश्यक कागद पत्रे जोडलेली असल्याने सदर शेतकऱ्यांना कांदा अनुदान मिळणे बाबत कृषी उत्पन्न बाजार समिती जळगाव जामोद ने ठराव घेऊन शिफारस केलेले पत्र व ठराव जोडलेले असुन सादर केलेल्या प्रस्तावातील २९४० शेतकऱ्यांचा पात्र अनुदान यादीत समावेश करण्यात यावा अशी विनंतीचे निवेदन श्री समाधान दामधर यांनी कृषि मंत्री श्री धनंजय मुंडे व माजी कृषि मंत्री श्री अब्दुल सत्तार यांना केली आहे. सदर प्रस्ताव हे शासनाच्या विहित तारखेत, विहित कागदपत्रे जोडून, विहित नमुन्यात सादर केलेले असुन सदर शेतकऱ्यांना कांदा अनुदान मिळणे बाबत मा. तहसीलदार जळगाव जामोद व मा. उप-विभागीय अधिकारी जळगाव जामोद जिल्हा बुलढाणा यांनी पत्र पाठविले असुन कृषी उत्पन्न बाजार समिती जळगाव जामोद ने ठराव घेऊन शेतकऱ्यांना कांदा अनुदान मिळणे शिफारस केलेली आहे असल्याने शेतकऱ्यांचा पात्र कांदा अनुदान यादीत समावेश करणे बाबत आदेशीत करून कार्यवाही करण्यात यावी अशी विनंती श्री समाधान दामधर यांनी केली आहे. त्यामूळे पुन्हा एकदा कांदा उत्पादक शेतकऱ्यांची आशा पल्लवीत झाली असुन सरकार आम्हा शेतकऱ्यांना दिलासा देईल असा विश्वास शेतकऱ्यानी व्यक्त केला आहे*

Post a Comment

0 Comments