*अतिवृष्टीमुळे मलकापूर तालुक्यातील गावांचा संपर्क तुटला;जनजीवन विस्कळीत*.
*तहसिलदार सुरडकर पूर परिस्थितीवर लक्ष ठेवून प्रशासकीय मदतीसाठी सज्ज*
मलकापूर प्रतिनिधी नागेश सुरंगे

मलकापूर:-मलकापूर मंडळात १२५ मिलिमीटर पाऊस पडल्याने अतिवृष्टीमुळे मलकापूर तालुक्यातील काही गावांचा संपर्क तुटला आहे.तहसीलदार आर यु सुरडकर पूर परिस्थितीची पाहणी करत आढावा घेऊन संपूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेवत प्रशासकीय दृष्ट्या मदती करीता सज्ज आहेत.P पर्जन्यमानानुसार ६५ मिलिमीटर च्या वर पाऊस झाला तर तो पाऊसp अतिवृष्टी मध्ये मोडला जातो. मलकापूर मंडळात १२५ मिलिमीटर, जांभूळधाबा मंडळात ६९ मिलिमीटर एवढा पाऊस झाला असून धरणगाव मंडळातील पावसाची नोंद मिळू शकली नाही. अतिृष्टीमुळेp तालुक्यातील विशेषतःपान्हेरा, वडोदा, हरसोडा, काळेगाव व म्हैसवाडी या गावांचा संपर्क तुटला असून जनजीवन विस्कळीत झाले आहे.पूर परिस्थितीची असलेल्या या गावांची पूर परिस्थितीची पाहणी करीत आढावा तहसीलदार आर यु सुरडकर यांनी घेतला.विशेष म्हणजे तुंबलेल्या पाण्यामुळे वाहन पुढे जात नसल्याने पान्हेरा येथे प्रशासकीयप्पपप्प यंत्रणेला पायी जावे लागले. दरम्यान हरसोडा-काळेगाव रस्त्यावर चौफेर पाणी तुंबले असून या रस्त्यावर कुठेतरी एक शेतकरी अडकला असल्याची बाब समोर आली. परंतु जोपर्यंत पाणी ओसरणार नाहीपप्प तोपर्यंत या बाबीची पुष्टी होऊ शकतp नाही तरी खबरदारीच्या दृष्टीने तहसीलदार यांनी झोडगा येथे एनडीआरएफ ची चमू बोटीसह सज्ज ठेवत त्या व्यक्तीला तातडीने शोधण्याची शोध मोहीम सुरूp करण्याचे निर्देश दिले. तर धरणगावp येथे जुनी गढी घसरल्याने चार जनावरे दगावली आहेत. या दौऱ्यात तहसीलदार आर यु सुरडकर यांचे समवेत पंचायत समिती गटविकास अधिकारी उद्धव होळकर, सहायक अधिकारी संदीप नारखेडे, तलाठी मनोज एदलाबादकर, धीरज जाधव, के.सी. चव्हाण, कोतवाल निलेशp म्हात्रे, निलेश तायडे, चालक दिलीप तायडे सह स्थानिक ग्रामसेवकp सहभागी झाले होते.P*अतिवृष्टीमुळे मलकापूर तालुक्यातील गावांचा संपर्क तुटला;जनजीवन विस्कळीत*.
*
0 Comments