Advertisement

महाराष्ट्रातील पहिलाच प्रयोग ........* 2 *सन्मान परिवाराच्या माध्यमातून जिल्हा परिषद शाळेतील मुले शिकतील IOT(इंटरनेट आॕफ थिंग्स ))

*महाराष्ट्रातील पहिलाच प्रयोग ........* *सन्मान परिवाराच्या माध्यमातून जिल्हा परिषद शाळेतील मुले शिकतील IOT(इंटरनेट आॕफ थिंग्स )* जळगाव जामोद ( प्रतिनिधी)
*महाराष्ट्र राज्यातील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाची ओळख होण्यासाठी व भविष्यातील संधी ओळखत त्याचे सोने करता यावे याकरिता जळगाव जामोद तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा मधून सन्मान परिवाराच्या माध्यमातून IOT (इंटरनेट ऑफ थिंग्स )हा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. शिक्षण क्षेत्रात होणारे बदल आणि तंत्रज्ञानाचा विकास पाहता त्याला अनुसरून असणारे शिक्षण शाळेतून दिल्या गेले पाहिजे हे लक्षात घेऊन सन्मान परिवाराचे मार्गदर्शक प्राध्यापक शाम फाफट सर यांनी जि प शाळेतील विद्यार्थ्यांकरीता IOT (इंटरनेट ऑफ थिंग्स ) हा महत्त्वाकांक्षी प्रयोग राबवण्याचे ठरवले आहे. या प्रयोगाकरिता लागणाऱ्या साहित्याच्या कीट तायवान वरून जळगाव जामोद चे पंचायत समितीचे विस्तार अधिकारी श्री संदीप मोरे साहेब यांनी सन्मान परिवाराला दिलेल्या देणगी राशीतून बोलवण्यात आल्या आहेत .आर्टिफीसियल इंटेलिजेंस ची गरज पाहता - बालपण पासून विद्यार्थ्याला तंत्रद्यान काय आहे हे समजने गरजेचे , टेक्नॉलजी स्मार्ट होत असताना विद्यार्थी - शिक्षक - पालक ह्याना पण स्मार्ट होने आवश्यक , विद्यार्थ्याल बालपन पासून प्रोग्रामिंग शिकवल्य गेली तर भविष्याचा उत्कृष्ट इंजीनियर होईल - ग्रामीण आदिवासी भाग या तंत्रज्ञान शिकन्यास माग़े राहणार नाही - उलट भविष्याचे चांगले इंजीनियर आदिवासी भागत तयार होतील - ह्यासाठी हा प्रायोगिक प्रयत्न “ सन्मान परिवार “ करत आहें - डॉ आशीष गांधी जामोद / ताइवान व त्यांचे मित्र मंडली तंत्रद्यान देत आहे दि. 8/ 7/ 2023 ला IOT इंटरनेट ऑफ थिंग्स च्या झालेल्या कार्यशाळेत प्राध्यापक शाम फाफट सर यांनी प्रास्ताविक करताना भविष्यातील धोके, गरज आणि संधी यावर IOT ची उपयोगिता सांगितली. या संदर्भात मार्गदर्शन सौ चंचल गांधी मॅडम यांनी केले. तर कार्यक्रमाचे अध्यक्ष गटशिक्षणाधिकारी जळगाव जामोद श्री वामन फंड साहेब यांनी कार्यक्रम शंभर टक्के यशस्वी करण्याची ग्वाही शिक्षण विभागातर्फे दिली. विस्तार अधिकारी श्री संदीप मोरे साहेब यांनी कार्यक्रमाची उपयोगिता जाणून सदर कार्यक्रमाला भविष्यातही सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपक उमाळे यांनी तर आभार प्रदर्शन जफर बेग यांनी केले. कार्यशाळेला विस्तार अधिकारी जावरकर साहेब, सन्मान परिवाराचे नितीन सातव, डॉ. महादेव सातव ,अनिल भगत श्रीकृष्ण भटकर ,अजिंक्य टापरे, दीपक जाधव ,राजेश कोकाटे, सर्व केंद्राचे केंद्रप्रमुख तथा तंत्रस्नेही शिक्षक उपस्थित होते. IOT (इंटरनेट ऑफ थिंग्स) हा महाराष्ट्रातील पहिला खाजगी पायलट प्रयोगा आ. डॉ. संजय कुटे यांनी दिल्या शुभेच्छा.... सन्मान परिवारातर्फे राबविण्यात येणारा IOT ( इंटरनेट ऑफ थिंग्स) हा महाराष्ट्रातील पहिला व एकमेव प्रयोग आहे . यामध्ये जळगाव जामोद तालुक्यातील उत्साही, तंत्रस्नेही 20 शिक्षक व त्यांच्या शाळेची निवड करण्यात येणार आहे . याकरिता लागणारे मार्गदर्शन व कीट विनामूल्य शाळांना सन्मान परिवारातर्फे पुरविण्यात येणार आहे . याद्वारे जि प शाळेतील विद्यार्थ्यांच्या बुद्धीचा व क्षमतेचा विकास होण्यास मदत होईल. जळगाव जामोद चे आमदार डॉ. संजय कुटे हे बाहेरगावी असल्यामुळे त्यानी या उपक्रमाकरिता विदयार्थ्यांना व शिक्षकांना मोबाईलद्वारे शुभेच्छा दिल्या.सन्मान परिवाराला ता्यवान देशावरून आलेल्या किट देताना मान्यवर *

Post a Comment

0 Comments