Advertisement

जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षकाचे तिसरीच्या विद्यार्थ्यासोबत अनैसर्गिक कृत्य..धानोरा महासिध्द येथील घटना.* . 2 जळगाव जामोद {प्रतिनिधी}

*जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षकाचे तिसरीच्या विद्यार्थ्यासोबत अनैसर्गिक कृत्य..धानोरा महासिध्द येथील घटना.* . जळगाव जामोद {प्रतिनिधी} जळगाव जामोद तालुक्यातील धानोरा महासिद्ध येथे जिल्हा परिषद शाळेतील तिसऱ्या वर्गाच्या शिक्षकाने वर्गातील विद्यार्थ्यासोबत अनैसर्गिक कृत्य केल्याप्रकरणी जळगाव जामोद ठाण्यात आरोपी शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल जळगाव जामोद पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येणाऱ्या धानोरा महासिद्ध येथे जिल्हा परिषद शाळेत शाळेवर कार्यरत असलेले शिक्षक जावेदोदिन नसीमुद्दीन ह्या शिक्षकाने दिनांक 7 जुलै 2023 रोजी आपल्या वर्गात शिकत असलेल्या एका विद्यार्थ्याला वाचन करण्याच्या बहाण्याने बोलावून त्या विद्यार्थ्याचं छळ करून त्याच्यासोबत अनैसर्गिक कृत्य केल्याचं उघडकीस आल्यानंतर पीडित विद्यार्थ्यांचे आई-वडिलांनी जळगाव पोलीस ठाण्याकडे धाव घेतली व सर्व प्रकार ठाणेदार यांच्यासमोर सांगितले की पीडित विद्यार्थी हा शाळेतून घरी आल्यावर ट्युशनला गेला व तिथं रडत होता त्यानंतर घरी आला व घरी येऊन सुद्धा सतत रडत होता आई-वडिलांनी त्याला का रडतो काय झाला असा विचारले असता पीडित विद्यार्थ्याने सांगितले की त्याच्यासोबत आरोपी शिक्षक
यांनी कशाप्रकारे छळ केला सदर प्रकरणांमध्ये जळगाव पोलिसांनी पीडित विद्यार्थ्यांची आईच्या तक्रारीवरून आरोपी शिक्षकाविरुद्ध कलम 377, 506 भादवी व सहकलम 4,6 पोक्सो प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी व ठाणेदार यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक रंजना आवारे हे करत आहे*

Post a Comment

0 Comments