Advertisement

अवैध चालू असलेले रक्त लघवी तपासणी केंद्र तात्काळ बंद करा दिपक इंगळे यांचा उपोषणाचा इशारा...

*अवैध चालू असलेले रक्त लघवी तपासणी केंद्र तात्काळ बंद करा दिपक इंगळे यांचा उपोषणाचा इशारा...* जळगांव जा. प्रतिनिधी:- नागेश भटकर जळगांव जामोद तालुक्यात अनेक वर्षापासून अवैधरित्या रक्त, लघवी तपासनी केंद्रे सुरू आहेत, सदर केंद्रांकडे कोणत्याही प्रकारचे परवाना नसतांना तसेच लॅब चे संचालक हजर नसतांना असिस्टंट हे डॉक्टरांकडून पाठविलेल्या पेशन्टचे रक्तनमुने घेवून रिपोर्ट देतात ज्यामुळे पॅथोलॉजी केंद्रे हे लुटमारीचे ठिकाणे झाली आहेत.
याबाबत दिपक इंगळे यांनी तालुका आरोग्य अधिक्षक जळगांव जामोद यांना मागीतलेल्या माहीती अधिकारावरून त्यांनी जा. क ताआअजजा / मा.अ./47/23 दि 27/06/2023 नुसार शहरातील सर्व प्रमाणीत लॅब चालकांची सूची दिली त्यामध्ये जळगांव जामोद शहरात दोन लॅब चालक हे अवैध आहेत त्यामध्ये 1 आयकॉन क्लिनीकल लॅब, काजीपूरा चे संचालक अजीजउल्ला अनिस अहेमद व 2. उन्नती क्लिनीक लॅब, नांदूरा रोड जळगांव चे संचालक श्याम जुमळे यांचे लॅब हया प्रमाणीत विदयापिठानूसार परवाना धारक नसून प्रत्यक्ष लॅब चालक हे उपस्थित नसतांना सूध्दा रक्तनमुने. लघवी तसेच इतर तपासण्यांचे सॅम्पल घेवून त्यांची परस्पर रिपोट दील्या जातात ज्यामुळे चूकीचा औषधोपचार होवून रुग्णांची आर्थीक लुट होते. त्यामुळे हया गंभीर विषयाला दुर्लक्ष न करता तात्काळ सदर दोन्ही लॅब सिलबंद करण्यात याव्यात अन्यथा मला जनतेच्या आरोग्याच्या हिताचे दृष्टीने आपल्या कार्यालयसमोर आमरण उपोषणास बसावे लागेल आणि त्यानंतर होणा-या परिणामास आपण सर्वस्वी जबाबदार असाल अशी तक्रार दीपक गजानन इंगळे यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments