*महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या*
*"एक सही संतापाची" अभियानात ग्रामीण भागात प्रचंड प्रतिसाद.*
प्रतिनिधी नागेश भटकर

चिखली महाराष्ट्र मध्ये सुरू असलेल्या राजकीय घडामोडी वर महाराष्ट्रातील मतदार व सर्वसामान्य नागरिक हा मतदान रुपी अधिकाराने भरडल्या जात आहे. सकाळी एक पक्षाचे नेते तर संध्याकाळी दुसऱ्या पक्षाचे नेते होतात. सकाळी विरोधी तर संध्याकाळी सत्ताधारी होतात. याच ज्वलंत प्रश्नावर सबंध महाराष्ट्रातील नागरिक विवंचनेत आहे. या संपूर्ण घटनेचा संताप जन माणसांच्या मनामध्ये तळ ठोकून बसला असून आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सद्यस्थितीत सुरू असलेल्या राजकीय घडामोडीवर प्रहार करण्यासाठी एक सही संतापाची हे स्वाक्षरी अभियान हाती घेतले आहे याचाच एक भाग चिखली विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण भागामध्ये या एक सही संतापाची या स्वाक्षरी अभियानाला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुकाध्यक्ष विनोद खरपास यांच्या खंबीर नेतृत्वामध्ये चिखली तालुक्यामध्ये अमडापुर पेठ, दहिगाव,महिमळ,वरखेड, मंगरूळ नवघरे,कव्हळा, सावरखेड करणखेड,महातमखेड, टाकरखेड,शेलसुर,धोत्रा भनगोजी,उतरादा, यांसह इतर गावांमध्ये एक सही संतापाची स्वाक्षरी अभियान राबविण्यात आले. ग्रामीण भागातील माणसांच्या मनातील संताप हा स्वाक्षरीच्या माध्यमातून फलकावर उमटु लागला आहे. या एक सही संतापाची या अभियानाला चिखली तालुक्यामध्ये उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला असून या अभियान राबविण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुका अध्यक्ष विनोद खारपास, यांचे सह उपतालुका अध्यक्ष मयुर प-हाड, शेतकरी सेल तालुकाध्यक्ष अरुण येवले, विकास कदम,वरखेड सरपंच विनोद कणखर,विष्णु कणखर,पंढरी परीहार, अमोल येवलेकर, एकनाथ अंभोरे, भगवान येवले, वसंतराव येवले,भरत नरवाडे, सचिन प-हाड, गणेश कणखर, ,विकास कदम .ज्ञानेश्वर वांजोळ ,शुभम ढोमणे,मुकूंदा वांजोळ, संतोष रसाळ,उमेश नखोद, विनायक होंगे, मनोज होगे,सागर लंके, गणेश देवकर , सुरेंद्र गवई, सुधिर गवई ,पवन सुरूशे यांचे अमडापुर,दहिगांव, महिमळ, वरखेड, मंगरूळ नवघरे, कव्हळा सावरखेड,करतवाडी, करणखेड महातमखेड,टाकरखेड,या गावचे जेष्ठ नागरिक महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित-सहभागी होते.*
0 Comments