*विज पडल्याने दोन तरुण जखमी जळगाव जामोद तालुक्यातील घटना..*
प्रतिनिधी:- नागेश भटकर
जळगाव जामोद तालुक्यामध्ये येत असलेल्या गोराळा धरण परिसरात दिनांक सहा जुलै रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास विजेच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाल्याने गोराळा धरणाजवळ छत्री घेऊन पाऊस किती पडला हे पाहण्यासाठी जगदीश भारसिंग मोहता वय २२ रा.गोराळा धरण व साना लोहारसिंग निंगवाल वय २८ रा.गोराळा धरण हे दोन तरुण गेले असता त्याचवेळी काही अंतरावर विज पडल्याने विजेच्या धक्क्याने जखमी झाले असता जखमी अवस्थेत दोघांनाही गावकऱ्यांच्या मदतीने जळगाव जामोद येथील ग्रामीण रुग्णालयात येथे आणले असता दोघांनवरही प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी खामगाव येथील सामान्य रूग्णालयात संदर्भित करण्यात आले..
0 Comments