Advertisement

कर्जबाजारीपणामुळे 35 वर्षीय आनंदा रामेश्वर भोरे यांची गळफास घेऊन आत्महत्या...*

*कर्जबाजारीपणामुळे 35 वर्षीय आनंदा रामेश्वर भोरे यांची गळफास घेऊन आत्महत्या...* जळगांव जा.प्रतिनिधी:- जळगाव जामोद तालुक्यातील असलेल्या पिंपळगाव काळे येथे दिनांक 19 जुलै रोजी दुपारी साडेतीन वाजेच्या दरम्यान गावातीलच रहिवासी असलेले आनंदा भोरे यांनी त्यांच्या राहत्या घराचे दुसऱ्या मजल्यावर कापूस ठेवलेल्या रूममध्ये छताच्या लोखंडी हुकला दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. घटनेची माहिती मृतक आनंदा भोरे यांचा चुलत भाऊ स्वप्निल भोरे यांनी जळगाव जामोद पोलीस स्टेशनला दिली असता घटनास्थळी जाऊन पोलिसांनी पंचनामा केला व मृतक आनंदाचे मृत शरीर जळगाव जामोद येथील ग्रामीण रुग्णालय येथे शवविच्छेदन क्रियेसाठी पाठविण्यात आले. घटनेचा प्राथमिक तपास ग्रेड पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मण गव्हाळे यांनी केला. घटनेची फिर्याद मृतकाचा चुलत भाऊ स्वप्निल भोरे यांने जळगाव पोलीस स्टेशनला दिली असता मर्ग नंबर 48/2023 कलम 174 जा.फौ. दाखल करण्यात आला असून पुढील तपास ठाणेदार दिनेश झांबरे यांच्या मार्गदर्शनात हेड कॉन्स्टेबल प्रभाकर देवचे हे करीत आहेत. मृतक आनंदा भोरे यानी शेतीसाठी बँकेचे कर्ज घेतले होते. व ते बँकेचे कर्ज फेळू शकले नाहीत त्यामुळे बँकेचे कर्ज वाढत गेल्याने त्यांनी आत्महत्या केल्याचे कळते तसेच त्यांच्या घरात कापसाला भाव मिळत नाही म्हणून कापूस पडून होता. त्याचे पश्चात आई वडील पत्नी एक मुलगी व एक मुलगा असा बराच मोठा आप्तपरिवार आहे..

Post a Comment

0 Comments