Advertisement

अतिवृष्टी व महापुरामुळे नुकसान झालेल्या जळगांव जा व संग्रामपूर तालुका भागाची महाराष्ट्र प्रदेश सचिव तथा जळगांव जा मतदार संघाच्या पक्षनेत्या डॉ.सौ.स्वातीताई वाकेकर,महाराष्ट्र प्रदेश सचिव सौ.जयश्रीताई शेळके यांनी केली पाहणी...* प्रतिनिधी नागेश भटकर

*अतिवृष्टी व महापुरामुळे नुकसान झालेल्या जळगांव जा व संग्रामपूर तालुका भागाची महाराष्ट्र प्रदेश सचिव तथा जळगांव जा मतदार संघाच्या पक्षनेत्या डॉ.सौ.स्वातीताई वाकेकर,महाराष्ट्र प्रदेश सचिव सौ.जयश्रीताई शेळके यांनी केली पाहणी...* प्रतिनिधी नागेश भटकर दि.22 जुलै रोजी जळगांव जामोद तालुका व संग्रामपूर तालुका येथे मुसळधार पावसाचा कहर,त्यामुळे नदी नाल्यांना आला महापूर यांनी पाणी शिरल्याने जनजिवन विस्कळीत झाले हजारो एकर जमीन पिकांसह खरडुन गेल्याने शेतकरी मोठ्या प्रमाणात अडचणीत आले शेतकरी शेतमजुरांना मुसळधार पावसाचा फटका शेतपिकाच्या नुकसानसह मोठ्या प्रमाणात घराची पडझड सुद्धा झाली त्याचबरोबर गुराढोरांच्या चाऱ्याचे व गुराढोरांच्या गोठ्याचे सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले लोकांच्या घरात पाणी शिरल्यामुळे घरातील सर्व सामानाचे व धान्याचे सुद्धा नुकसान झाले काही घरे जमीनदस्त तर काही घरांची प्रचंड प्रमाणात पडझड झाली काही ठिकाणी जनावरे व शेती साहित्य नदीच्या पुरात वाहून गेले सरकारने कोणत्याही प्रकारचे निकष न लावता सरसकट नुकसानग्रस्त शेतकरी, शेतमजुरांना यांना आर्थिक मदत देण्यात यावी.याप्रसंगी संग्रामपूर तालुक्यातील ग्राम वरवट बकाल येथे पाहणी करतांना महाराष्ट्र प्रदेश सचिव तथा जळगांव जामोद मतदार संघाच्या पक्षनेत्या डॉ.सौ.स्वातीताई वाकेकर, महाराष्ट्र प्रदेश सचिव सौ.जयश्रीताई शेळके, संरपच सौ.प्रतिभाताई इंगळे,ग्रा.प.सदस्य डाबरे ताई,सतिष टाकळकर,संतोष टाकळकर,राजुभाऊ राठोड, माजी संरपच श्रीकृष्ण दातार, प्रल्हाद दातार,जलील सर, इंगळे सर,मनोज वाघ,आदी मान्यवर व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्राम एकलारा येथे पाहणी करतांना व पुरांच्या पाण्यात वाहून गेलेल्या स्व.मधुकर धुळे यांच्या घरी सांत्वन पर भेट देताना डॉ.सौ.स्वातीताई वाकेकर,सौ.जयश्रीताई शेळके,संरपच सौ.भारती प्रविण अस्वार,बळीराम धुळे, शिवकुमार गिरी, विवेक राऊत,राजुभाऊ राठोड, श्रीकृष्ण दातार,डांबरे ताई,आदी गावकरी उपस्थित होते. ग्राम आकोली बु येथे अतिवृष्टी व महापुर झालेल्या नुकसानीची पाहणी करतांना डॉ.सौ.स्वातीताई वाकेकर,सौ.जयश्रीताई शेळके, तालुकाध्यक्ष राजेंद्र वानखडे,संरपच निलेश सोळंके,प्रकाश साबे,मुरलीधर उमरकर ,श्रीराम अढाव,आदी गावकरी उपस्थित होते..

Post a Comment

0 Comments