*जळगाव जामोद शहर व तालुक्यामध्ये ना.बच्चुभाऊ कडू यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम संपन्न* प्रतिनिधी नागेश भटकर

प्रहार जनशक्ती पक्ष जळगाव जामोद च्या वतीने पाच जुलै रोजी लोकनायक दिव्यांग गरजू दिनदुबळ्यांचै कैवारी माजी मंत्री तथा अध्यक्ष दिव्यांग मंत्रालय महाराष्ट्र राज्य प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष माननीय आमदार बच्चू भाऊ कडू यांच्या वाढदिवसानिमित्त. पक्षाचे उपजिल्हाप्रमुख राजेश भाऊ लहासे यांच्या उपस्थितीत जळगाव जामोद ग्रामीण रुग्णालय येथे रुग्णांना फळ वाटप कार्यक्रम तसेच जळगाव जामोद नगर परिषद शाळांमध्ये गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले सोबतच तालुक्यातील आदिवासी गाव वडपाणी येथील शाळेत विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व वाटर बॅग चे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाच्या वेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे उपजिल्हाप्रमुख राजेश भाऊ लहासे तालुका सचिव गजानन कपले .शहर उपप्रमुख सागर दातीर .जामोद सर्कल प्रमुख रोशन सपकाळ अमोल बोडखे. तालुका प्रसिद्धीप्रमुख महादेव गटमने प्रहारसेवक मधुकर भाऊ जाधव श्याम वाघ आनंद संबारे . निलेश बावणे .अमर जोशी. रुपेश धुरडे यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे संचालन मुख्याध्यापक महादेव सातव सर यांनी केले. यावेळी शाळेतील शिक्षक गोपाल पाऊल झगडे यांची उपस्थिती होती.
यावेळी नामदार बच्चुभाऊ यांच्या आदेशानुसार प्रत्येक तालुक्यातील एक शाळा प्रहार सेवकांनी दत्तक दत्तक घ्यावी या संकल्पनेतून वडपाणी ही शाळा उपजिल्हाप्रमुख राजेश भाऊ लहासे यांनी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने दत्तक घेण्यात आली. संध्याकाळी बाहेर फिरणाऱ्या फिरणाऱ्या निराधार यांना भोजन देण्यात आले.
0 Comments