पोलीस उपनिरीक्षक पांडुरंग इंगळे सह इतर कमऺचारी व खाली बसलेले आरोपी
दिसत आहे.
जळगांव जामोद -अहिल्या न्यूज 24
दिनांक 1 आगस्ट 2023 रोजी पोलीस स्टेशन जळगाव जामोद येथे मा. पोलीस अधिक्षक बुलडाणा यांच्या आदेशानुसार कोम्बीग आपरेशन राबविण्यात आले. या दरम्यान जळगाव जा. पोलीसांनी अनेक दिवसापासुन मा. न्यायालयास पाहीजे असलेले आरोपी शोधमोहीम राबविली. यादरम्यान 1)भांदवी 324 ,323 चे गून्हात पाहीजे असलेला आरोपी नामे अनील रमेश कटारे वय 32 रा. आकोली खुर्द 2)भांदवी 380 461 भादवी तसेच 325 मध्ये पाहीजे असलेला निगराणी बदमाश आरोपी नामे देवीदास दामा मूंडे वय 32 वर्ष तसेच 3) भांदवी 379 429 मध्ये पाहीजे असलेला आरोपी नामे भागवत विठ्ठल मुंडे वय 35 यांना गूप्त बातमीच्या आधारे ताब्यात घेण्यात आले. सदरची कारवाई पो .नी. दिनेश झामरे यांच्या मार्गदर्शनात सपोनी पांडुरंग इंगळे , पोहेका प्रकाश माटे, नापोका सुनील वावगे ,पो का प्रेम पवार व अनंता गावंडे यांनी केली.
0 Comments