प्रतिनिधी नागेश भटकर
जळगांव जामोद:-दिनांक एक ऑगस्ट 2023 रोजी खेरडा बुद्रुक येथील पूरग्रस्त पीडित कुटुंब तहसील कार्यालय जळगाव जामोद येथे येऊन माननीय तहसीलदार मॅडम यांना निवेदन देऊन केली मदतीची मागणी गेल्या 22 जुलै रोजी खेर्डा बु" येथे महापुराच्या पाण्याने नदीकाठच्या घरामध्ये पुराचे पाणी घुसले या पुराच्या पाण्याने या कुटुंबांचे संसार रस्त्यावर आले अनेकांची घराची पडझड व मौल्यवान ह्या पाण्यात वाहून गेल्या परंतु त्या़चे पंचनामे आज पर्यंत सबंधित अधिकाऱ्याने का केली नाही अशी मागणी खेर्डा बुद्रुक वाशीयांनी केली आहे आणि तात्काळ पंचनामे करून या सर्व बाधित कुटुंबांना तात्काळ पंचनामे करून मदत द्यावी असे वंचित बहुजन आघाडीचे तालुका उपाध्यक्ष सुनील बोदडे यांनी यावेळी मागणी केली या अर्जावर २७ पुरग्रस्तांची नावे आहेत यावेळी वंचित बहुजन आघाडी चे तालुका उपाध्यक्ष सुनिलभाऊ बोदडे, महिला नेत्या पार्वताबाई इंगळे, सुनिताताई हेलोडे, ग्रामपंचायत सदस्य प्रदिप मोरखडे, ग्रामपंचायत सदस्य सुनील तावडे,संतोष पवार, अमोल तायडे योगेश तायडे,व पुरग्रस्त खेर्डावासी उपस्थित होते.
0 Comments