मलकापूर प्रतिनिधी : नागेश सुरंगे
दिनांक 31 जुलै 2023 रोजी सकाळी पाच वाजून तीस मिनिटांनी मलकापूर बस स्थानकात गेलो असता असे निदर्शनास आले की सकाळी पाच वाजून 30 मिनिटांनी सुटणारी मलकापूर फलटण ही बस चालकाने योग्य ते फलाटावर न लावता भलतीकडेच पिण्याच्या पाण्याचे प्याऊजवळ लावून ठेवली होती या गाडीने जाणारे बहुतांश प्रवासी हे वृद्ध व अपंग असून सर्व प्रवासी पिण्याच्या पाण्याच्या प्याऊ जवळ धावत गाडीत बसण्याकरता गेले असता चालक व वाहकाने त्यांची दिशाभूल करत त्यांना सांगितले की ही गाडी जात नाही त्यामुळे वृद्ध महिला व पुरुष प्रवासी परत आपल्या फलाटाच्या ठिकाणी येऊन उभे राहिले याबाबत वाहतूक नियंत्रक यांना विचारणा केली असता त्यांनी सांगितले की मलकापूर डेपो ची संभाजीनगर गाडी गेल्याशिवाय फलटण गाडी जात नसते परंतु मलकापूर डेपोच्या गाडीला चालक व वाहक आलेले नसल्याने सदर गाडी लेट झाली आहे तसेच प्रवाशांना गाडीत बसून देण्याबाबत व दिशाभूल केल्याबाबत फलटण गाडीच्या वाहन चालक व वाहकांना विचारणा केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली आपले नाव सांगण्यास नकार दिला फलटण गाडी ही फलटण डेपोची असून या चालक वाहकांनी कोणत्याही प्रकारचे प्रवाशांना सहकार्य न करता अरेरावीची भाषा वापरली चालकाचा बॅच क्रमांक 28 994 व वाहकाचा बॅच क्रमांक 38 523 असा आहे यावरून असे निदर्शनास आले की शासनाने वृद्ध प्रवाशांना व अपंगांना दिलेली सवलत ही फलटण गाडीवरील चालक व वाहकांचे जिव्हारी लागलेली आहे गाडी फलाटावर लावल्यानंतर चालक व वाहक गर्दी जास्त झाल्याने वृद्ध व अपंग प्रवासी कसे गाडीत चढतात यांची गंमत हसत हसत पाहत होते या अशा विक्षिप्त प्रवृत्तीच्या वाहन चालक व वाहक यांच्यामुळे वृद्ध व अपंग प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे काही महिन्यापूर्वीच चालक व वाहकांच्या संपला सोशल मीडिया व वृत्तपत्रांनी धार दिल्याने एसटी महामंडळाच्या वाहन चालक व वाहकांच्या पगारात वाढ करण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे परंतु फलटण गाडीचे चालक व वाहकांच्या वागणुकीमुळे असे दिसून येते की फक्त पगार घेणे हाच एक मुख्य उद्देश या चालक व वाहकांचा असून वृद्ध व अपंग प्रवाशां विषयी कोणतीही संवेदना यांच्यात उरलेली नाही प्रवाशांना त्रास देणे याला चालक वाहक प्राधान्य देत असताना दिसले अपंग वृद्ध प्रवाशांना प्रवास भाड्यात सवलत दिल्याने एसटी महामंडळाचे दरडोई उत्पन्न वाढले असून हे उत्पन्न कमी करण्याचा प्रयत्न फलटण गाडीवरील चालक व वाहकांचा असल्याचे दिसून आले वृद्ध व अपंग प्रवाशांना नाहक त्रास देणाऱ्या व एसटी महामंडळाचे उत्पन्न कमी करण्यावर जोर देणाऱ्या चालक व वाहक।ला निलंबित का करण्यात येऊ नये असा प्रश्न उपस्थित झाला आहे तसेच इतर आगारातून येणारे चालक व वाहक हे मलकापूर या ठिकाणी एसटीतच मुक्कामी राहतात किंवा नाही की मेहकर आगारात घडलेली घटना मलकापूर आगारातही घडत आहे जसे एसटी सोडून चालक व वाहक नातेवाईकांकडे झोपायला गेले असा प्रकार मलकापूर आगारातही होत आहे का ?याकडे आगार व्यवस्थापकांनी लक्ष देण्याची गरज आहे व हे बाहेरुन येणारे चालक वाहक आपल्या वेळेवर बस योग्य त्या फलाटावर लावतात किंवा नाही आणि वृद्ध व अपंग प्रवाशांना सहकार्य करतात किंवा नाही याकडे लक्ष देणे सुद्धा आगार व्यवस्थापकांची जबाबदारी आहे
0 Comments