ग्रामीण रुग्णालय येथील वैद्यकीय अधिकारी असलेले डॉक्टर स्वप्नील वेरुळकर हे संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ योजना या वृद्ध लाभार्थ्यां जवळून वयाच्या दाखल्यासाठी पाचशे ते हजार रुपये घेत असल्याची तक्रार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जळगाव जामोद शहराध्यक्ष नागेश भटकर यांनी जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याकडे दिनांक 27 जून रोजी केली होती त्या तक्रारीवर जिल्हा शल्यचिकित्सक यांनी त्रिस्तरीय चौकशी समिती गठित करून डॉक्टर स्वप्नील वेरुळकर यांनी केलेले या गैरप्रकाराची ग्रामीण रुग्णालय जळगाव जामोद येथे येऊन या त्रीसदस्यीय समितीने डॉक्टर स्वप्नील वेरुळकर हे दोषी असल्याचा अहवाल जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याकडे दिल्याने दिनांक 8 ऑगस्ट रोजी संबंधित डॉक्टर स्वप्निल वेरूळकर यांना अध्यक्ष जिल्हा निवड समिती व जिल्हाधिकारी यांनी दोषी डॉक्टर वेरुळकर यांना सेवामुक्त केले आहे. संबंधित डॉक्टर वेरुळकर हे सेवामुक्त केल्याने जिल्हाभरातील सरकारी दवाखान्यातील डॉक्टरांमध्ये खळबळ माजली आहे.
0 Comments