बार्शीटाकळी : प्रतिनिधी नागेश भटकर
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज साहेब ठाकरे यांना प्रेरित होऊन तसेच राज्य उपाध्यक्ष तथा संपर्क अध्यक्ष विठ्ठलरावजी लोखंडकार यांच्या आदेशाने अकोला जिल्हाध्यक्ष पंकज साबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत व मनसे तालुकाध्यक्ष सचिन पाटील गालट, महीला तालुकाध्यक्ष कल्पनाताई राठोड , मनविसे तालुकाध्यक्ष वैभव उर्फ राज पाटील कोहर यांचे नेतृत्वाखाली महाराष्ट्र नवनिर्माण सेना बार्शीटाकळी तालुक्यातील अनेक नागरिकांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये प्रवेश घेतला. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेना, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना , महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेना पदाधिकाऱ्यांच्या नियुक्ती करण्यात आल्या. येणारी प्रत्येक निवडणूक जसे ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपरिषद, महानगरपालिका व विधानसभा महाराष्ट्र नवनिर्माण सेना ताकदीने लढणार तसेच घर तिथे मनसैनिक गाव तिथे शाखा हा संकल्प जिल्हाध्यक्ष पंकज साबळे यांनी कार्यकर्त्यांसह केला.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष पंकज साबळे तसेच प्रमुख उपस्थिती म्हणून जिल्हा सहसचिव मोहन मते , तालुका प्रसिद्धीप्रमुख बाळकृष्ण उताने ,तालुका सचिव गजानन काळे, तालुका संघटक संदीप गोपनारायण , महिला सेना तालुका उपाध्यक्ष स्वाती ढोरे हे उपस्थीत होते. यावेळी कान्होपात्रा ढोरे, रोशन माणिक जाधव यांची मनविसे उप तालुकाध्यक्ष पदी तर अजिंक्य कोल्हे यांनी मनविसे तालुका सचिव त्याच प्रमाणे सागर खरारे यांची मनविसे उपशहर अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. मीडिया प्रमुखपदी ऋषिकेश नानोटे तर मनविसे प्रसिध्दी प्रमुख पदी श्याम नानोटे यांची निवड करण्यात आली. यावेळी विलास घुमसे यांची मनसे तालुका सचिवपदी नियुक्ती करण्यात आली.यावेळी आशिष पाटील खांबलकर , आदेश पाटील ढवळे , पवन पोवाडे होता यांच्यासह इतर जणांनी मनसे मध्ये प्रवेश घेतला . सदर कार्यक्रमास उपतालुकाध्यक्ष शिवप्रताप मेघाडेसह सुलोचना पवार, विद्या चव्हाण, चित्रा टोगरे, अनुराधा इंगळे, राधा उताने , गणेश खराटे , अंकुश कुरसेंगे , विशाल डाबेराव , दीपक खराटे , रोहित जाधव , पवन जाधव , अंकित मनोहर , शुभम सरकटे , गणेश पिंपळकर , सचिन कुटे , अभिषेक खंडारे , गौरव इंगळे, भूषण सरकटे , तुषार शिरसाट , प्रफुल जाधव,भूषण नानोटे, देवेंद्र येवले आदी मनसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments