*आसलगांव उपबाजार येथे पार पडली भव्य बक्षीस योजने अंतर्गत पहिली सोडत...*
प्रतिनिधी:- नागेश भटकर
जळगांव जामोद कृषि उत्पन्न बाजार समिती मार्फत परिसरातील शेतक-यांसाठी सुरु करण्यात आलेल्या प्रोत्साहनपर भव्य बक्षीस योजनेची प्रथम सोडत करण्यात आलेली आहे.याविषयी समितीचे मा. सभापती प्रसेनजीत किसनराव पाटील यांनी माहिती देतांना सांगीतले की, जळगांव जामोद बाजार समिती ही नेहमीच परिसरातील शेतक-यांसाठी नवनविन उपक्रम राबवित आहे.त्याचाच एक भाग म्हणुन समितीने परिसरातील शेतकरी बांधवांसाठी माहे जुलै २०२३ पासुन प्रोत्साहनपर भव्य बक्षीस योजना सुरु केली आहे. यामध्ये समितीच्या आसलगांव उपबाजारामध्ये संपुर्ण महिनाभर बाजार दिवशी शेतक-यांना शेतिमालाच्या लिलाव व हिशोब पट्टी नुसार विनामुल्य बक्षीस कुपण वितरीत केले जात आहेत. आणि वितरीत केलेल्या बक्षीस कुपण चे पुढील महिन्याचे पहिल्या मंगळवार ला सोडत जाहिर केल्या जाणार आहे. यामधून समितीच्या आवकेमध्ये वाढ होऊन समितीचे उत्पन्न वाढुन समिती ला विकास कामे करणेसाठी उर्जा मिळणार आहे.आज दि.०१/०८/२०२३ मंगळवार ला समितीच्या आसलगांव यार्ड येथे माहे जुलै २०२३ या महिन्यामध्ये एकुण २६१ शेतक-यांना वितरीत केलेल्या कुपण ची समितीचे मा. संचालक, शेतंकरी व व्यापारी यांचे समक्ष कु. माही पुरुषोत्तम माहोदे वय वर्षे पाच या लहान मुलीच्या हातुन ईश्वर चीठ्ठी प्रमाणे सोडत काढण्यात आलेली आहे. सोडतीमध्ये प्रथम तिन क्रमांकांचे विजेते पुढील प्रमाणे १) प्रथम बक्षीस उभे धान्य सेप्रेटर एक नग - धोंडुजी निर्मळ, रा. आसलगांव, २) द्वितीय बक्षीस ताळपत्री दोन नग हे दिनानाथ तुळशीराम बोदळे सावरगांव, डिगांबर ज्ञानेश्वर जाधव,वडशिंगी३) तृतीय बक्षीस फवारणी पंप (इलेक्टॉनिक) तिन नग शे. अलिम शे. मोबिन, सावरगांव, उमेश रमेश जावळे, आसलगांव, आत्माराम नारायण राऊत, आसलगांव यांना वरील प्रमाणे बक्षीसे वितरीत करण्यात आलेली आहेत.४) चौथे बक्षीस किसान टॉर्च एकुण २० नग २० शेतक-यांना५) पाचवे बक्षीस छत्री एकुण ३० नग ३० शेतक-यांना याप्रसंगी समितीचे मा. सभापती, प्रसेनजित पाटील, उपसभापती माणिक वाघ, दत्ताभाऊ पाटील, प्रभात पाटील, उल्हास माहोदे, महादेव भालतडक, मनोज राठी, आणि देविदास पाटील सर्व संचालक, दिपंक धर्माळ प्रतिनिधी सहा. निबंधक सह. संस्था, जळगांव जा. अनंता वाघ, खरेदी विक्री संचालक आणि सुरेश श्रीरंग बोडखे, शिवहरी सुधाकर कुटे, रामदास सुगदेव नवथळे, रामदास सिताराम जवळकार गजानन कपले, आशिष वायझोडे, संजय चांदणे हे शेतकरी प्रतिनिधी शैलेश दैय्या, योगेश केला, विनायक इंगळे व्यापारी प्रतिनिधी, आसलगांव सरपंच इंगळे आबा व सदस्य तसेच बाजार समितीचे कर्मचारी उपस्थित होते.
0 Comments