जळगाव येथे माहेरी असलेल्या पत्नीला व सासूला जावयाने चाकू मारून जखमी केल्याची घटना दि7 ऑगस्ट रोजी घडली आरोपी नितीन कैलास तायडे राहणार लक्कडगंज खामगाव हा फिर्यादी अमोल गणेश वानखडे राहणार झाडेगाव याचा जावई असुन दि 7 ऑगस्ट रोजी 3 वाजता फिर्यादी अमोल वानखडे हा घरासमोर जगन कळके यांचेसोबत गप्पा मारीत असतांना नमुद आरोपी हा फिर्यादी च्या घरात गेला म्हणुन फिर्यादि हे आरोपीच्या मागे घरात गेले असता आरोपी याने फिर्यादी ची बहीन पुजा हिस म्हणाला की. तु माझे विरोधात कोर्टात खावटीची केस टाकली आता तुम्हाला हिसका दाखवितो असे म्हणुन त्याने खिशातील चाकु काढुन जिवाने मारण्याच्या उददेशाने चाकुने फिर्यादीची बहीण पुजा हिच्या छातीवर, मानेवर, पाठीवर वार करून तिला गंभीर जखमी केले तेव्हा फिर्यादीची आई त्याचे तावडीतून बहीनीला सोडविण्याकरीता गेलो असता त्याने आईला सुध्दा जिवाने मारण्याच्या उददेशाने पोटात चाकु मारुन जखमी केले त्यानंतर फिर्यादीने आरोपीस पकडुन घराबाहेर ओढत आणले असता त्याने फिर्यादीला ला सुध्दा जिवे मारण्याची धमकी देवून जिवे मारण्याच्या उददेशाने चाकुने फिर्यादीच्या च्या डाव्या हाताचे दंडावर वार करून गंभीर जखमी केले. बहीण पुजा व आई गोकुळाबाई. आरोपीपासुन वाचण्यासाठी घरासमोरील गल्लीमध्ये धावलो असता आरोपी त्यांना मारण्यासाठी चाकु घेवुन धावत आल्याने शालीकराम सुखदेव डोंगरदिवे यांच्या घरासमोर आरोपीने पुन्हा फिर्यादीची ची बहीन पुजा हिस पकडुन तिला खाली पाडुन गळ्यावर चाकु मारत असल्याने मित्र जगन व सोपान मोरे यानी त्याला पकडले असता तो पळुन जात असतांना सिमेंट रोडवर पडला त्यामुळे त्याच्या डोक्याला मार लागला त्यानंतर गावातील लोकांनी बहीन व आई यांना उपचाराकामी ग्रामीण रुग्णालय येथे नेले व तेथील डॉक्टरांनी त्यांचा प्रथमोपचार करून त्यांना सामान्य खामगाव येथे रेफर केले अशा फिर्यादीच्या तक्रारीवरून जळगाव पोलिसांनी आरोपी विरुद्ध कलम 307, 506 मानवी नुसार गुन्हा दाखल केलेला आहे पुढील तपास ठाणेदार दिनेश झांबरे यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय पांडुरंग इंगळे करीत आहे
0 Comments