प्रतिनिधी:- नागेश भटकर
जळगाव जामोद तालुक्यात येत असलेल्या हनवतखेड येथील बावीस वर्षीय विवाहित युवतीचा सर्पदंश झाल्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना दिनांक आठ ऑगस्ट रोजी घडली.. सविस्तर असे की हनवतखेड येथे आदिवासी डावर कुटुंबीय आपल्या कुडाच्या घरात राहतात घरात काम करत असताना फुलाबाई सुनील डावर हिला कोब्रा जातीच्या विषारी सापाने दंश केल्याने गंभीर अवस्थेत फुलाबाई डावर तिला उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय जळगाव जामोद येथे आलेले असतात डॉक्टरांनी चेक केले असता विवाहितेचा मृत्यू झाला होता. सदर घटनेची माहिती लिहेपर्यत तक्रार देण्यात आली नव्हती..
0 Comments