जळगाव (जा), ता. १५ तालुक्यातील गावं निंभोरा बु येथे ,स्वातंत्र्यवीर गणपतराव इंगळे उद्यानविद्या महाविद्यालय, जळगाव जामोद येथील बी. एससी. (ऑनर्स) उद्यानविद्या मधील अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांनी 'रावे' (ग्रामीण उद्यानविद्या कार्यानुभव) उपक्रमातंर्गत "मेरी माटी, मेरा देश" व १५ ऑगस्ट क्रांती दिवसाचे औचित्य साधून वृक्षारोपण करून स्वातंत्र्य लढ्यातील वीरांना आदरांजली वाहिली.
या प्रसंगी निंभोरा बु ग्रामपंचायत कार्याल व शाळेच्या आवारात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. जिल्हापरिषद शाळेच्या प्रांगणात, ग्रामपंचायत परिसरात मध्ये वृक्षारोपण करण्यात आले . कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच रेखाताई चव्हाण ह्या लाभल्या. तसेच प्रमुख उपस्थितीत जळगाव जामोद येथील वनकर्मचारी ए.जी. घुयकर, शिवनंद बुद्वत, जी.एस. खोलगडे, एस.पी. देवकर, ए. बी. पर्वते, गणेश तरडे व जिल्हापरिषद शाळेतील प्राचार्य राजेश चितोडे आणि ग्रामपंचायत सदस्य श्री.अरूण अलाट , भुषण सोनोने व समस्त गावकरी मंडळी व सर्व उद्यानविद्या महाविद्यालयाचे विध्यार्थी उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वी करण्या करिता अभिषेक उगले, शिवम वानखेडे,युराज टिकार, शिवम सुल्ताने, मन्मत सुल्तानपुर या विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विशाल तायडे, उपप्राचार्य प्रा. सतिश धर्माळ, कार्यक्रम अधिकारी प्रा. प्रितेश वानखडेव विषय तज्ञ प्रा. जिव्हेश साळी यांचे मार्गदर्शन लाभले .
0 Comments