जळगाव (जा) ता. 13 - तालुक्यातील सावरगांव येथे स्वातंत्र्यवीर गणपतराव इंगळे उद्यानविद्या महाविद्यालयातील बी. एससी (ऑनर्स) उद्यानविद्या अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांनी "रावे" (ग्रामीण उद्यानविद्या कार्यक्रमा कायानुभव) अंतर्गत) " मेरी माटी मेरा देश" औचित्य साधून वृक्षारोपन करण्यात आले.या प्रसंगी सावरगांव ग्रामपंचायत कार्यालया अंतर्गत येणाऱ्या शाळेच्या आवारात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. शाळेच्या प्रांगणात ग्रामपंचायत परिसरात तथा रसत्यांच्या दुर्तका वृक्षारोपन करुण शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यय स्थानी सरपंच सौ. कविता प्रकाश कराळे या होत्या व उपसरपंच श्री. संदीप समाधान राठोड व ग्रामपंचायत सदस्य सौ. मिनाली अजय शेगोकार व सुनिता बाळूभाऊ उबर्डे व इतर सदस्य व कर्मचारी श्री. शाम दाभाडे व इतर कर्मचारी व समस्त गावकरी मंडळी व उद्यानविद्या महाविद्यालयाचे विद्यार्थी उपस्थित होते.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी तेजस डोंगरे, हरिष देशमुख, आकाश फेंगडे, अभिषेक गाडगे, विवेक गावंडे, साहित्य गवळी व इतर विद्यार्थीनी परिक्षम घेतले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विशाल तायडे, उपचार्य प्रा. सतिश धर्माळ, अधिकारी प्रा. प्रितेश वानखडे व विशेषज्ञ प्रा. जिव्हेश साळी यांचे मागदर्शन लाभले. , कार्यक्रम
0 Comments