Advertisement

भाऊ-दादाच्या सतरंज्या उचलण्यात काही मजा नाही तरुणांनो अभ्यासाला लागा. सेवानंद वानखडे ठाणेदार, दहिहांडा


 
प्रतिनिधी अमोल रा.राणे
चोहोट्टा बाजार परिसरातिल गावागावात स्पर्धा परीक्षांचे अभ्यास केंद्र उघडण्यात यावे. या अभ्यास केंद्राची वाटचाल केंद्र आणि राज्य शासनाच्या शासकीय विभागात विद्यार्थी सेवेत रूजू व्हावेत हे ध्येय लक्षात घेत हे अभ्यास केंद्र अन्य विद्यार्थ्यांना प्रेरणादायक व्हावे , गावागावात वाचनालय,अभ्यास केंद्र चालू व्हावे अशी अपेक्षा ठेवून प्रत्येकाने कार्य केले पाहिजे, सणासुदीच्या काळात युवकांनी आध्यात्मातुन भक्तीचा आनंद घेत धार्मिक कार्यक्रम शांततेत पार पाढावे,व कुठल्याही धर्माच्या जातीच्या भावना दुखावल्या जातील असे क्रुत युवकांनी करु नये! सरकारी नोकरी ला आळा येईल अश्या वादविवादापासुन दुरचं रहावे व मोबाईल चा वापर आपल्या अभ्यासाला व ज्ञानात भर टाकेल या साठी करावा, तुमच्या मोबाईल च्या सर्व हालचाली सेव्ह होत असतात हे लक्षात ठेवावे, मोबाईल च्या अतिवापरामुळे , आनलाईन गेम मुळे तुमचे आयुष्य बरबाद होऊ शकते याचीही नोंद सर्व तरुणांनी घ्यावी असे प्रतिपादन धामणा बु गावात आयोजित कार्यक्रमात दहिहांडा पोलीस स्टेशन चे ठाणेदार सेवानंद वानखडे यांनी व्यक्त केले, यावेळी सर्वोदय क्लासेस चे ततेश पेटे सर आयोजन पंकज जुमळे , सागर वानखडे व धामणा बु येथील ग्रामस्थांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते, यावेळी ते बोलत होते...

Post a Comment

0 Comments