*आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात व खेळी मेळीने साजरा*
स्थानिक खामगाव नगरपरिषद माॅ जिजाऊ महिला व्यायाम शाळेत तालुका क्रीडा समिती, नगरपरिषद, श्रीमती सु.रा. मोहता महिला महाविद्यालय, उपविभागीय कार्यालय ,तहसील कार्यालय, तसेच तालुका आरोग्य अधिकारी खामगाव यांच्या संयुक्त विद्यमाने बारावा आंतरराष्ट्रीय योग दिन अतिशय उत्साहात व खेळी मेळीणे साजरा करण्यात आला. प्रमुख अतिथी म्हणून नगरपरिषद अभियंता श्री मोकासरे साहेब. श्री.घुगे साहेब ,देवकाते सर, डॉ .खंडारे,आयोजक श्री लक्ष्मी शंकर यादव ,(तालुका क्रीडा अधिकारी खामगाव ).प्रा. डॉ.सौ. सीमा देशमुख (संचालक व खेळ शारीरिक शिक्षण) .उपस्थित होते श्री लक्ष्मी शंकर यादव प्रमुख अतिथींचे गुलाब पुष्प देवून स्वागत केले.यांनी योग दिनाचे महत्त्व उपस्थित योग साधकांना पटवून सांगितले. प्रा. डॉ. सीमा देशमुख व त्यांच्या महिला महाविद्यालयाच्या योगा चमु तुम्हारी प्रज्ञाविनोद काकड, कु. वैष्णवी राजू सपकाळ, कु. शारदा संतोष डोंगरे ,कु राठोड, यांनी उपस्थित योगसाधकांसमोर आयुष मंत्रालया व महाराष्ट्र शासनाच्या प्रोटोकॉल प्रमाणे सर्व प्रार्थना, योगासने, पूरक हालचाली ,प्राणायाम, कपालभाती ,भ्रामरी प्राणायाम, ध्यान, शांतीपाठ ,योग गीत,इं क्रमानुसार प्रात्यक्षिक दाखवून योगसाधकांकडून करून घेऊन योगासन प्राणायामाचे फायदे व घ्यावयाची काळजी संपूर्ण माहितीनिशी पटवून सांगून घर घर मे योगा ही एक जीवनशैली सर्वांनी बनवली पाहिजे .वर्षातून एकच दिवस योगाचा सराव न करता स्वस्त भारतासाठी शरीर आणि मन स्वस्थ ठेवायचे असेल तर योग प्राणायाम हा रामबाण उपाय सर्वांनी अंगीकाराला पाहिजे, असे प्रा. डॉ .सीमा देशमुख यांनी योग साधकांसमोर सांगितले .महिला व पुरुष सर्व विभागाचे योग साधक बहुसंख्येने या कार्यक्रमास उपस्थित होते.
0 Comments